ग्रंथालय उघडे करा म्हणण्याच्या भानगडीत पडू नका
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे कार्यवाह नंदु बनसोड यांचे आवाहन
मुंबई
ग्रंथालय सुरू करायचे असतील तर तत्पुर्वी राज्यातील प्रत्येक ग्रंथालय कर्मचा-यांच्या बँक खात्यावर किमान दहा - दहा लाख रूपये संबंधीत ग्रंथालय संघटनेने किंवा शासनाने जमा करावे. अशी विनंती महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे कार्यवाह नंदु बनसोड यांनी केली आहे. कोरोणाच्या आजाराने कोणी नागरीक मृत्यू पावल्यास शासनच त्याचे अंत्यसंस्कार करतात. अर्जदार व संबंधीत संघटनांना याची जाणीव किंवा अभ्यास झालेला दिसत नाही. या आजाराला कोणीही सहजतेने घेवू नका. कोरोणाच्या संक्रमणापासून जे दूर आहेत ते नशिबवान समजावे. मला काही होणार नाही या भ्रमात कोणत्याही ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथालय कार्यकर्त्यांनी राहू नये. कृपया ग्रंथालय उघडे करा म्हणण्याच्या भानगडीत पडू नका असे आवाहनही बनसोड यांनी केले आहे.
ग्रंथालय सेवा देतांना ग्रंथालय कर्मचारी त्या अनुषंगाने त्याचे कुटूंब कोरोणाच्या संक्रमण आजाराने त्रस्त झाल्यास त्यांच्या मदतीला कोण धावून येणार? भविष्यात संबंधीत संघटना किंवा ग्रंथालय पदाधिकारी यांच्या आजाराची जबाबदारी घेतील काय?
पाच दिवसाचे औषधास रूपये सहा हजार लागतात किमान दहा दिवस औषध घ्यावी लागते. या व्यतिरिक्त घरामध्ये वारंवार जंतुनाशक औषधांची फवारणी करावी लागते, डेटाॅल सारख्या जंतूनाशक लिक्विडचा आंघोळ करतांना दररोज उपयोग करावा लागतो. ग्रंथालय कर्मचारी यांचे कुटूंब आजारी पडले तर त्यांची देखभाल करण्यासाठी कोण ग्रंथालय कार्यकर्ते समोर येणार आहेत ? त्याच्या आजारपणाचा खर्च कोण उचलणार वा कोण खर्च करणार? ग्रंथालय संचालनालयातील अधिकारी हुसे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करतो त्यांच्याकडून यासंबंधी माहिती घ्यावी. अनेक युवा डाॅक्टर/पोलीस/पोलीस दलातील पोलीस, पोलीस अधिकारी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी हे कार्य करतांना मृत्यूमुखी पडले. प्रसंगी त्यांचा देह उचलण्यास किंवा अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी समोर येवू शकले नाही.
0 टिप्पण्या