आजपासून मध्य रेल्वेच्या सेवांमध्ये  २ महिला विशेष सहित अतिरिक्त ८ सेवा वाढणार 

आजपासून मध्य रेल्वेच्या सेवांमध्ये  २ महिला विशेष सहित अतिरिक्त ८ सेवा वाढणार 
 मुख्य  मार्गावर ४ विशेष आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ४ विशेष  


मुंबई
महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केल्यानुसार, मध्य रेल्वे सध्या अत्यावश्यक सेवेतील  कर्मचार्‍यांसाठी ४२३ विशेष उपनगरी सेवा चालवित आहे.  सोशल डिस्टंसिंग  कायम ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने दि. १ ऑक्टोबर, २०२० पासून महिला विशेष सुरू करण्याचा आणि दैनंदिन विशेष उपनगरी सेवांची संख्या ४२३ वरून ४३१ करण्याचा निर्णय घेतला आहे.


 कल्याण येथून ४ सेवा (२ डाउन व २ अप)
 १ अप महिला विशेष कल्याण येथून सकाळी ०८.२५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०९.३४ वाजता पोहोचेल.  १ डाउन महिला विशेष  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १८.३५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे १९.४४ वाजता पोहोचेल.  डाउन विशेष  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.४५ वाजता सुटेल व कल्याण १०.५० वाजता पोहोचेल.  अप विशेष १६.१० वाजता कल्याण येथून सुटेल आणि १७.१६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.  (या विशेष सेवा फक्त भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा आणि डोंबिवली येथे थांबतील)


 ट्रान्सहार्बर लाइन 
४ सेवा (२ डाउन व २ अप) ठाण्याहून <-> पनवेल जाण्या/येण्यासाठी पनवेल विशेष ठाणे येथून  ०९.०० वाजता सुटेल आणि  पनवेल येथे ०९.५२ वाजता पोहोचेल.  पनवेल विशेष ठाणे येथून  १८.३० वाजता सुटेल आणि  पनवेल येथे १९.२४ वाजता पोहोचेल.   ठाणे विशेष पनवेल येथून ०७.५५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे  ०८.५० वाजता पोहोचेल.  ठाणे विशेष पनवेल येथून  १७.२० ता. ठाणे येथे १८.१५ वाज पोहोचेल.  (ही विशेष जलद असेल आणि फक्त रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर येथे थांबेल). 


 येथे नमूद करण्यात येते आहे की, मध्य रेल्वेवरील विशेष उपनगरी गाड्या आणि स्थानके नियमित स्वच्छ व योग्य प्रकारे निर्जंतुक  केले जातात. महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या सर्व प्रवाशांना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावेत व  रेल्वे स्टेशनवर जाताना आणि विशेष उपनगरी गाड्यांमधून प्रवास करताना मास्क घालावे. असे प्रसिद्धी पत्रक १० सप्टेंबर रोजी  मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.


 


 अनलॉक-5 ची महाराष्ट्र राज्य सरकारकडून नियमावली जाहीर
5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू होणार
50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी
मुंबईच्या डबेवाल्यांना ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा
डबेवाल्यांना लोकल प्रवासासाठी QR कोड दिले जाणार
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक्स्प्रेसनं जाता येणार
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल वाढवणार
पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू होणार
शाळा आणि कॉलेजेस 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार
राज्यात ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू राहणार


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या