Top Post Ad

अनुदानित व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना सहाय्यता निधी मिळावा

ऑनलाइन शिक्षण गृहीत न धरता जेव्हा शाळा, महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू होतील तेव्हा
जो अभ्यास प्रत्यक्ष रित्या शिकविला जाईल. तोच अभ्यासक्रम परीक्षेसाठी गृहीत धरून
विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी. - भारतीय  लोकसत्ताक विद्यार्थी संघाची मागणी


 

ठाणे 

मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. मागील पाच महिन्यापासून शैक्षणिक संस्था  बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाची पद्धत शाळा आणि महाविद्यालयांनी अवलंबली आहे. परंतु त्यामध्ये बऱ्याच मर्यादा असल्याचे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मत आहे. 

कारण शहरामध्येच चांगल्या दर्जाचे नेट, रेंज भेटत नाही मग ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे, हे अनेक सर्वेक्षणातून उघड झाले आहे. मोबाईल नाही, रेंज नाही, नेट नाही, मोबाईल एक मुले तीन, नेट बॅलन्स नाही, ऑनलाईन जॉईन कसे व्हायचं तेच समजत नाही, ऑनलाईन शिक्षण कसे द्यायचं हेच अनेक शिक्षकांना माहित नाही. यामुळे विध्यार्थी, पालक आणि शिक्षक सुद्धा गोंधळली आहेत.

 

शिवाय ऑनलाइन शिक्षण हे सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत आहे असे नाही म्हणून वरील सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने ऑनलाइन प्रद्धतीने केलेल्या शिकवणीवर आधारित विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता जेव्हा शाळा महाविद्यालय प्रत्यक्ष रित्या चालू होतील, तेव्हा जो काही अभ्यास शिकविण्यात येईल त्यावर आधारित विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात तसेच लॉक डाऊनच्या परिस्थितीत शाळा व महाविद्यालय पालकांकडून फि आकारत आहेत, सध्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती कोलमडून गेली असून शासनाने शाळा व महाविद्यालये यांना सहाय्यक निधी द्यावा जेणेकरून पालक आणि पाल्यांना दिलासा मिळेल असे “भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाच्या” वतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना आज भेटून निवेदन देण्यात आले. प्रसंगी भारतीय  लोकसत्ताक विद्यार्थी  संघाचे  तसेच भारतीय लोकसत्ताक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com