सामान्य जनतेला वाढीव बिले मंत्र्यांंना मात्र वीजबीलच नाही
मुंबई
कोरोना महामारीमळे घेण्यात लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकाटांचा सामना करावा लागला. आजही अनेक कुटुंबांची यातून सावरलेले नाहीत. मात्र या काळात महावितरणाने सर्वसामान्यांना अवाच्या सवा वीज बिलं पाठवून नागरिकांचे कंबरडे मोडले. याकरिता अनेक आंदोलने झाली. मंत्र्यांना साकडे घालण्यात आली. मात्र आश्वासनाशिवाय काहीही पदरी पडलेले नाही. आजही तोच प्रकार अद्याप सुरु असल्याने आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. एकीकडे ही परिस्थीती असताना दुसरीकडे मात्र राज्यातील बड्या १५ मंत्र्यांना मागील चार ते पाच महिन्यापासून वीजबिलं आली नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये धनजंय मुंडे यांच्यासह आदित्य ठाकरे, जीतेद्र आव्हाड आणि इतर मंत्र्यांचा समावेश आहे. ही रक्कमच सर्वसामान्य जनतेच्या बीलातून वसूल करीत असल्याचा आरोप आता वीज कंपन्यांवर पिडीत जनता करीत आहे. आरटीआयमधून आलेल्या बातमीनंतर याचा सर्वसामान्य नागरिकांनी राग व्यक्त केला आहे. बड्या मंत्र्यांना विजेचं बिल का पाठविण्यात आलं नाही? असा सवाल उपस्थित केला जातोय.
लॉकडाऊनच्या काळात आलेली वीजबिलं भरताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा झाला होता. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनाही वीजबिलाचा शॉक बसला होता. या प्रकरणात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये या महिन्यात राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या वीजबिलाबाबत माहिती विचारली. लोक निर्माण विभागातील दक्षिण उप-विभागाकडून आलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये राज्यातील १५ मंत्र्यांना वीजबिलं पाठवण्यात आलेली नाहीत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मेपासून पाच मंत्र्यांना विजेची बिलं पाठविण्यात आलेली नाहीत. यामध्ये दादाजी भुसे, केसी पाडवी, अमित देशमुख, हसन मुश्रीफ आणि संजय राठौड यांची नावे आहेत. मागील महिन्यांपासून जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड़, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, अनिल परब, बाळासाहेब पाटील यांना विजेची बिलं पाठविण्यात आलेले नाहीत.
0 टिप्पण्या