जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागा मार्फत महिनाभर पोषण विषयक उपक्रमाचे नियोजन
ठाणे
गेल्या तीन वर्षांपासून सप्टेंबर महिना हा 'पोषण' माह म्हणून साजरा केला जातो. ठाणे जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिनाभर पोषणाच्या संदर्भात विविध उपक्रम हाती घेतले जातात. यंदा या अभियानाच्या माध्यमातून महिना
आरोग्य विभागातर्गत अंगणवाडी केंद्र व कार्यक्षेत्रातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे वजन व उंची मापन करून SAM बालकांची निश्चिती करणे, निश्चिती केलल्या बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी करून SAM बालाकांची VCDC मध्
तसेच ग्रामपंचायत विभागाच्या वतीन ICDS क्षेत्रिय यंत्रणा, आशा,ANM,स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधी ,स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक वा विशेष सभा आयोजित करून SAM बालकांचे व्यवस्थापन , मनरेगा अंतर्गत परसबागा, अंगणवाडी सुविधा, त्यावर उपाययोजना व पोषण बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. कृषि विभाग परसबागेसाठी आवश्यक तांत्रिक मदत करणार असून जिल्ह्यात ६४ परसबाग तयार करण्यात येणार आहेत. या उपक्रमा दरम्यान दृकश्राव्य माध्यमातून पोषण बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून गावातील गरोदर,स्तनदा माता, सहा वर्षा खालील बालक, किशोर वयीन मुली यांच्या पोषणा संदर्भात आढावा घेण्यात येणार आहे. तसेच विविध विषयावर बेबिनार सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविका प्रत्येक कुटुंबाला नियमित गृह भेटी देणार आहेत. शासनाने निर्गमित केलेले कोव्हीड १९ चे नियम पाळून हे अभियान राबविण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या