Top Post Ad

फ्लिपकार्ट होलसेलचा 12 शहरांमध्ये विस्तार

फ्लिपकार्ट होलसेलचा 12 शहरांमध्ये विस्तार


वसई / विरार 
उत्सवी हंगाम उंबरठ्यावर येऊन ठेपलेला असताना फ्लिपकार्ट होलसेल आता ठाणे-भिवंडी-उल्हासनगर, बृहन्मुंबई, वसई-विरार-मिरा-भाइंदर, ठाणे (कल्याण डोंबिवली) आणि ठाणे (नवी मुंबई) गाझियाबाद, फरिदाबाद, म्हैसूर, चंदिगड ट्रायसिटी, मेरठ, आग्रा, जयपूर,  अशा विविध 12 शहरांमध्ये उद्योगांना सेवा सुरू करणार आहे. या माध्यमातून आपल्या मालाची  किरकोळ विक्री करणार्‍या वर्गाला एकाच व्यासपीठावरून संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे लघु उद्योगांना विविध प्रकारची उत्पादने वाजवी किमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. या शहरांमध्ये फॅशनसह विस्तारीकरण करण्यात येणार असून फ्लिपकार्ट होलसेल हे किराणा दुकाने आणि सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योजक डिजिटल परिवर्तन घडवून त्यांना वेगाने प्रगती करण्यास, ग्राहकांना बांधून ठेवण्यास आणि त्यांची नफा मिळविण्याची क्षमता वाढविण्यास मदत करणार आहे  अशी माहिती फ्लिपकार्ट होलसेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन यांनी दिली. 


फ्लिपकार्ट होलसेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन म्हणाले, “उत्सवांचा हंगाम सुरू होत असताना आम्ही १२ शहरांमध्ये विस्तारीकरण करताना अत्यंत उत्साहात आहोत. एमएसएमई आणि किराणा दुकानांसाठी अधिक संधी तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ट्रेंडी जयपूरी कुर्तींपासून ते म्हैसूर सिल्क साड्यांपर्यंत, छोट्या उद्योगांनी डिजिटल परिवर्तन स्वीकारावे आणि अधिक भक्कम व्यवसायरूप घडवावे यासाठी त्यांची मदत करणे हा आमचा हेतू आहे. आमच्या उपक्रमामुळे देण्यात येणाऱ्या योगदानामुळे होणारी एमएसएमई आणि किराणा दुकानांची भरभराट पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि या माध्यमातून भारतात लाखो नव्या व रोमांचक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.”


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1