Top Post Ad

राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य


मुंबई


 शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे. गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यांनी शिक्षणमंत्री शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कौतुक केले. ते म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे,  विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेला शिक्षणासाठी जी स्वीट आणि राज्य शाळांकरिता गुगल क्लास रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. गुगल क्लासरुम मध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचे निरसन करू शकतात. तर सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन, ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड-गोडसे यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com