Top Post Ad

राज्यात लॉकडाऊनच्या काळात विविध गुन्ह्यांसाठी २० कोटीहून अधिक दंडाची वसूली

राज्यात लॉकडाऊनच्या काळात विविध गुन्ह्यांसाठी २० कोटीहून अधिक दंडाची वसूली



मुंबई


राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १५ ऑगस्ट या कालावधीत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २९ हजार ३५२ गुन्हे दाखल झाले आहेत. ३३ हजार ३६१ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध गुन्ह्यांसाठी २० कोटी ९९ लाख ७८ हजार ८४४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.  लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ५३ हजार ९१ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना - ३३३ (८८८ व्यक्ती ताब्यात) १०० नंबरवर आलेले फोन - १ लाख १० हजार २२५ राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२७ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे - १३४७ जप्त केलेली वाहने - ९५, ८२१ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस - (मुंबईतील ५५ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५९, ठाणे शहर १४ व ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी,रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १ ,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण २,जालना एसआरपीएफ १ अधिकारी,नवी मुंबई एसआरपीएफ अधिकारी १,एसआरपीएफ Gr9-१पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी,ए.टी.एस. १, उस्मानाबाद १,औरंगाबाद शहर ३,जालना १,नवी मुंबई २, सातारा २, अहमदनगर २,औरंगाबाद रेल्वे १,एसआरपीएफ अमरावती १,पुणे रेल्वे अधिकारी१, PTS मरोळ अधिकारी १,SID मुंबई १,नागपूर २, बीड १,सोलापूर ग्रामीण १, सांगली १, बुलढाणा १) सध्या २८६ पोलीस अधिकारी व २०२९ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com