रिक्षाचालकांना अर्थ सहाय्यासह कर्जमाफी मिळावी यासाठी रिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समितीचे राज्यभर बेमुदत उपोषण

क्रांतीदिनापासून रिक्षाचालक बेमुदत उपोषणाला बसणार 


ठाणे


चार महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीच्या लॉकडाऊनमुळे रिक्षा वाहतूक पुर्णपणे बंद आहे. त्यामुळे  चालक आणि त्यांच्या कुटुंबियांची पुरती वाताहत झाली आहे. मात्र, सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. प्रशासन दरबारी निवेदने देऊनही  सरकारला कोणतेही सोयर सुतक नाही. अखेर आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना अर्थसाह्य देण्यासह कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी  रिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समितीच्या वतीने रविवारपासून (दि. 9) राज्यभर बेमुदत उपोषण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अनिल चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस दयानंद गायकवाड यांनी दिली. 

महाराष्ट्रातील सुमारे 20 लाखांहून अधिक ऑटोरिक्षा चालक-मालक गेल्या चार महिन्यांपासून ऑटोरिक्षा बंद असल्यामुळे तसेचा कोणत्याही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसल्यामुळे अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. अशा परिस्थितीत या ऑटोरिक्षा चालकांना महाराष्ट्र शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊ करावी, अशा प्रकारची निवेदने रिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृति समितीच्या माध्यमातून शासनास देण्यात आली आहेत. परंतु, शासनाने ही बाब  गांभीर्याने घेतलेली नाही. ह्या बाबत तमाम ऑटोरिक्षा चालक मालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.  


याच कालावधीमध्ये महाराष्ट्रातील आठ ऑटोरिक्षा चालकांनी  आत्महत्या केल्या आहेत.  कित्येक ऑटोरिक्षाचालक हे नैराश्येमध्ये जगत आहेत. त्यामुळे  प्रत्येक ऑटोरिक्षा चालकास लॉकडाऊन कालावधीतील प्रत्येक महिन्याकाठी किमान रु. 5000/- ची आर्थिक मदत शासनाने द्यावी; आत्महत्याग्रस्त ऑटोरिक्षाचालकांच्या प्रत्येक कुटुंबास किमान रु. 10 लाखांची  मदत ताबडतोब शासनाने द्यावी; ऑटोरिक्षाचालकांना शेतकर्‍यांप्रमाणे  संपूर्ण कर्जमाफी मिळावी; ऑटोरिक्षा चालकांना कोविड योद्धा म्हणून घोषित करून त्यांना रु.50 लाखांचे विमा कवच जाहीर करावे; घोषित केलेल्या कलेल्या कल्याणकारी मंडळातची तातडीने अंमलबजावणी करा.या मागण्यांसाठी रिक्षाचालक उपोषणाला बसणार आहेत. या उपोषण आंदोलनात सर्वच संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवााहन करण्यात आले असून अनेक संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे रिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अनिल चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस दयानंद गायकवाड यांनी सांगितले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA