Top Post Ad

ओबीसीच्या समस्यांची जाण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचली पाहिजे - रघुनाथ महाले

 समस्यांची जाण  शेवटच्या घटकापर्यंत असलेला ओबीसी समाजपर्यंत पोहचली पाहिजे - रघुनाथ महाले


मुरबाड


,ओबीसींच्या मूळ समस्या व त्यावर उपाय करायचा असेल तर खऱ्या अर्थाने आमच्या समस्यांची जान आपल्या शेवटच्या घटकापर्यंत असलेला ओबीसी समाजपर्यंत पोहचली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन आखिल भारतीय ओबीसी महासभा महाराष्ट्र अध्यक्ष रघुनाथ महाले केले.  स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हसा, तालुका मुरबाड येथे महासभेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर पाटील, डॉ.विलास सुरोसे,राजेश पवार,ॲड.किशोर दिवेकर, साप्ताहिक ठाणे अरुणोदयचे संपादक गुरुनाथ भोईर, नागांव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले ओबीसींना याची जाणीव झाली पाहिजे आमचे हक्क काय आहेत आम्हाला कोणापासून आमचे हक्क हिरावून घेतले जात आहे याची जाणीव जेव्हा आमच्या बांधवांना होईल तेव्हा नक्कीच व्यवस्थे विरूध्द बंड करेल हेच कार्य राष्ट्रीय अध्यक्ष ललित कुमार लोधी यांच्या प्रयत्नातून आखिल भारतीय ओबीसी महासभा माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू झालेली आहे.आजपर्यंत आपण ६०% ते६५% असून ही दुसऱ्या पक्षात गुलाम म्हणून काम करत आहोत स्वतःच अस्तित्व उपलब्ध करू शकलो नाही ही आमची शोकांतिका आहे यासाठी आपल्याला एकत्र येणे काळाची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.


त्यानंतर अध्यक्ष यांनी भाषण करताना पाटील स्वतःच उदाहरण देऊन म्हणाले की ,माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करत असताना पंडित आजारी असल्यामुळे त्यांनी त्याच्या १२ वर्ष असलेल्या मुलाला पुजा करण्यास पाठविले. पूजा संपन्न झाली सर्व माणसे पूजा सपल्यानंतर ब्राह्मणाच्या पाया पडत होते ७० ते ८० वर्षाची म्हातारी मानस सुद्धा त्या ब्राह्मणाच्या पाया पडत होती हे स्वतःला खटकत होते. परंतु त्यांनी समोर बसलेल्या मंडळींना विचारले की, एखादा ब्राम्हणांचा मुलगा आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या पाय पडतो का तर नाही हे उत्तर आलं.  ही आमची मानसिक गुलामी आहे. यातून आपण बाहेर पडायला पाहिजे नाहीतर अजून यापुढे अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.


यावेळी अखिल भारतीय ओबीसी महासभचे मुरबाड तालुका अध्यक्ष म्हणून अनिल घुडे यांची निवड करण्यात आली. शेवटी ठाणे जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे यांचा वाढदिवस साजरा करून सर्व मान्यवर व जमलेली कार्यकर्ते महापुरुषांच्या विचारांची पुस्तके देऊन आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.



 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com