ऑनलाईन महाविद्यालय प्रवेश परिक्षा प्रक्रियेसाठी मदत केंद्र
ऑनलाईन महाविद्यालय प्रवेश परिक्षा प्रक्रियेसाठी मदत केंद्र

 

मुंबई

अकरावी ऑनलाईन प्रवेश सुरु झाले  असून राज्यात लॉकडाऊन असल्याने विद्यार्थाना अडचण निर्माण होत आहे. यामुळे वंचित घटकातील पालक हे सुज्ञान पालकांची मदत घेऊन नेटकॅफे किंवा विविध ठिकाणी  ऑनलाइन अर्ज भरत आहेत. परंतु इंटरनेटची गती कमी आदी कारणामुळे तेथे वेळेत काम होत नाही. शिवाय नेट- कॅफे मधून अतिरिक्त पैसे आकारून विद्यार्थी व पालकांची लूटमार केली जाते. तर एकीकडे  पालकांच्या खिशाला कात्रण बसत आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरला पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे पालकही जादा पैसे देऊन फॉर्म भरून घेतात. याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया मदत केंद्राची सुरुवात केली आहे. यावेळी हर्षा,कमलेश उबाळे,तुषार माळवी, राजु खरात, रुपेश हुंबरे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . वंचित बहुजन महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा  मायाताई कांबळे यांनी उपस्थित दर्शवली असून  नितिन वानखेडे यांचे  विशेष सहकार्य लाभले. 

 

विद्यार्थी व पालकांवरील  ताण कमी करण्यासाठी अॅड.बाळासाहेब आंबेडकर  यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश फॉर्म भरून देण्याकरीता मदत केंद्र चालू करण्यात आले आहे. या मदत केंद्रावर आपल्या पाल्यासोबत जाऊन विद्यार्थी मोफत फॉर्म भरू शकतात. तसेच प्रवेश प्रक्रिये बाबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून माहितीही घेऊ शकता. यासाठी  प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी  मदत केंद्राची , मदत विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.  त्याकरिता मुंबई विभाग स्नेहल सोहनी  9967632547,  स्वप्निल जवळगेकर : 8286258933 तर  ठाणे विभाग हर्षद बोले 9004664761, कमलेश उबाळे 9768276400 रोहित डोळस 8082061994  यांना  संपर्क करण्याचे आवाहन  वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने करण्यात आले आहे.

  

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या