राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी पंढरपुरात आंदोलन
मुंबई,
राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात यावी म्हणून पंढरपूर या ठिकाणी हरिभक्त पारायण यांच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. सर्व मंदिरे उघडावीत म्हणून साधुसंत त्याचप्रमाणे मठातील महाराज हे येत्या 31 ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण उपस्थित राहणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले
राज्यातील लॉकडाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने या लॉक डाऊनचा विरोध करीत राज्यात आंदोलनाला सुरुवात केली. या पूर्वी लॉकडाऊनच्या विरोधात राज्यभर निवेदने देण्यात आली. त्यानंतर राज्य भरातील एसटी तसेच शहरांतर्गत चालणाऱ्या बसेस चालू करण्यात याव्यात, तसेच छोटे उद्योग धंदे चालू करण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून राज्यभर डफली वाजवून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढल्याने लवकरच राज्यातील जिल्हा व शहरांतर्गत बससेवा चालू करण्यात येणार आहे. वंचितच्या आंदोलनाला मिळालेले हे मोठे यश आहे.
0 टिप्पण्या