वंचित बहुजन आघाडी लॉकडाऊन पाळणार नसल्याचा दिला इशारा
खामगाव
देशासह राज्यात कोरोना महारीचा बावू केला जात असून सरकार वेळोवेळी लॉकडाऊन वाढवित आहे. या लॉकडाऊनला १०० दिवसाचा कालावधी पुर्ण झाला असून अद्यापही लाँकडाऊन सुरूच आहे. फुटपाथवर बसणाऱ्या कोणत्याही गोरगरीबाला कोरोना झाल्याचे एकवित नाही. त्यामुळे आता कोरोना संसर्गाची भिती बाळण्याची गरज नाही. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाचे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. शासनाने तातडीने लॉकडाऊन थांबवावा व बस, रेल्वे, बाजारपेठा सर्व सुरू कराव्यात. आज दि.१ आँगस्ट पासून वंचित बहुजन आघाडी कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन पाळणार नसून नागरिकांनीही लॉकडाऊन तोडण्यासाठी पुढे यावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते भारिप प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांनी केले. तसेच जर सरकारला लॉकडाऊन करायचे असेल तर सर्वसामान्य लोकांच्या प्रत्येकाच्या खात्यात दर महिन्याला १० हजार रूपये टाका व आणखी वर्षभर खुशाल लॉकडाऊन करा असे खडे बोलही त्यांनी यावेळी सरकारला सुनावले.
स्थानिक विश्राम भवन येथे आज दि.१ आँगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना अशोक सोनोने म्हणाले की, देशात कोरोना आल्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या प्रत्येक आवाहनाला आतापर्यंत नागरीकांसह सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिला. अनेक महापुरूषांच्या जयंत्या ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही घरातच साजऱ्या केल्या. दरम्यान सरकारकरून वेळोवेळी लॉकडाऊनमध्ये वाढ केल्या जात आहे. देशात कोरोनाने बेरोजगारी आणि भुखबळीने अनेक महिलांच्या गळ्यातील साखळ्या तोडल्या. लॉकडाऊन सामान्यांच्या जिवावर उठले आहे. सुपर्ण देशात तब्बल ९ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याची माहिती आहे.
आता कोरोना संसर्गाची भिती बाळण्याची गरज नसून फुटपाथवर बसणाऱ्यांना आतापर्यंत कोरोना झाल्याचे ऐकवित नाही. कोरोना हा साधा आजार असून नागरिकांनी भिण्याची गरज नाही. देशात कोरानाचा केवळ बावू केल्या जात आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन न करता सर्व व्यवसाय पुर्ववत सुरू करण्याची गरज आहे. तसेच सर्व व्यापारी आणि व्यावसायीकांना प्रतिष्ठाने सुरू करण्यासाठी मोकळीक द्यावी आणि नागरिकांना शहरात फिरण्यासाठी कुठलेही बंधन घालू नये. नागरिकांनीही पुर्वीप्रमाणे सर्वसामान्य जिवन जगून लॉकडाऊन तोडण्यासाठी पुढे यावे असेही ते म्हणाले. कोरोना तपासणी ही संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आमदार, खासदार व धनदांडग्यांना उच्च दर्जेच्या खाजगी रूग्णालयात उपचार केला जातो तर सर्वसामान्यांना सरकारी रूग्णालयात भर्ती केल्या जाते. कोरोनाच्या नावाखाली देशात मोठा घोटाळा केल्या जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्यातील प्रेत्येक जिल्ह्यात लॉकडाऊन तोडण्याबाबतचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले असून यापुढे लॉकडाऊन नियम पाळणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला वंचितचे गणेश चौकसे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने, महिला जिल्हाध्यक्षा अनिताताई डोंगरे, संघपाल जाधव, नगरसेवक विजय वानखडे, राजेश हेलोडे, आरतीताई गवई, गिताताई नरवाडे आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या