Top Post Ad

म्हणून खाजगी कोरोना रुग्णालयांवर ठामपा गंभीर कारवाई करू शकत नाही

म्हणून खाजगी कोरोना रुग्णालयांवर ठामपा गंभीर कारवाई करू शकत नाही



ठाणे


अवाजवी बिल आकारणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या कारवाईत रुग्णालय बंद करणे हा उद्देश नसून रुग्णांना त्यांचे पैसे परत मिळणे आणि शासकीय दराने रुग्णांना बिल आकारणे हा उद्देश असल्याचे आयुक्तांनी सांगितले. कारवाईचा बडगा उगारला असतानाही अद्याप अनेक खासगी रुग्णालय अवाजवी बिले आकारत आहेत. मात्र यावर ठोस कारवाई करणे पालिका प्रशासनाला अवघड जात आहे. कारण या रुग्णालयांमधून अनेकांचे उपचार सुरू आहेत आणि अशा वेळी रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून पालिका गंभीर कारवाई करू शकत नाही, असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.


कोरोनासाठी अधिग्रहीत केलेल्या खाजगी रुग्णालयातून रुग्णांची लूट होत असलेल्या अनेक तक्रारीनंतर ठाणे महापालिकेने खाजगी रुग्णालयांवर लेखापरिक्षणाकरिता वेगळे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने दिलेल्या अहवालात कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी सर्वसामान्य रुग्णांकडून केवळ ४० दिवसांमध्ये १ कोटी ८२ लाख रुपये जादा बिले आकारली असल्याची बाब उघड झाली आहे. आता पालिका प्रशासनाकडून कारवाईनंतर रुग्णांना त्यांचे पैसे परत मिळणार आहे. आतापर्यंत केवळ २६ लाख ६८ हजाराची वसुली या रुग्णालयांकडून झाली आहे. विविध रुग्णालयांनी केलेल्या १५ लाखांचा खुलासा पालिकेनेही मान्य केला आहे.  त्यामुळे १५ लाख आणि २६ लाख, असे एकूण ४१ लाख या रुग्णालयांकडून वसूल करण्यात आले असले, तरी उर्वरित आक्षेपार्ह रक्कमेचा खुलासा या रुग्णालयांना द्यावाच लागणार असल्याचे ठामपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.





सर्वसामान्य रुग्णांकडून  अवाजवी बील आकारणाऱ्या होरायझन प्राईम या रुग्णालयाची कोविडची मान्यता रद्द करण्यात आली आहे.  एक महिन्यांची नोंदणी रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतल्याने खासगी रुग्णालयांना धक्का बसला आहे. आयुक्तांच्या या सडेतोड भूमिकेनंतर आता इतर खासगी कोविड रुग्णालयांचे धाबे दणाणले असून रुग्णांकडून वसूल केलेली आक्षेपार्ह रक्कम या रुग्णांना परत देण्यास त्यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. लेखापरिक्षण समितीने दिलेल्या अहवालानुसार, १० जुलै ते २१ ऑगस्ट दरम्यान विविध रुग्णालयांनी कोरोनाच्या उपचारासाठी पावणे दोन कोटींची आक्षेपार्ह रक्कम वसूल केली असल्याचे  अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. यामध्ये आतापर्यंत ४ हजार १०६ बिले मिळाली असून ३ हजार ३४७ बिले तपासण्यात आली आहेत, तर २६ लाख ६८ हजार ९६४ इतकी रक्कम रुग्णांना परत देण्यात आली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com