आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा तर १०० रुपये शुल्क मोजा
नवी दिल्ली
आधार कार्ड ही भारतीयांची नवी ओळख मानली जात आहे. शासकीय तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठी पुरावा म्हणुन आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर मोबाईल नंबरकरिताही आधारकार्ड आवश्यक आहे. आता आधार कार्डशिवाय कोणतेही काम होत नसल्याने प्रत्येकजण आधार कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन किंवा महा ई सेवा केंद्राद्वारे आधार कार्ड काढत असतो. यापूर्वी आधार कार्डवर कोणताही बदल करावा असल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. परंतु आता आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. याबाबत युआयडीआयएकढून सांगण्यात आले आहे.
जर आपल्याला बायोमेट्रीकमध्ये बदल करायचा असेल तर ५० रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. आधार कार्डवर बदल करतेवेळी अर्जासोबत फी भरावी लागणार आहे. याचबरोबर आपले नाव, पत्ता किंवा जन्माची तारीख बदलण्यासाठी आपल्याला वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आपल्याला आधार कार्ड काढतेवेळी स्वत:च्या ओळखीसाठी पुरावा म्हणून ३२ प्रकारची कागदपत्रे लागतात. तसेच रहिवाशी पुराव्यासाठी ४५ प्रकारची कागदपत्रे आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून १५ कागदपत्रे स्वीकारतात. आधार कार्ड काढण्यासाठी किंवा कोणताही बदल करण्यासाठी यातील एक पुरावा सादर करू शकता. नविन आधार कार्ड काढायचे असल्यास किंवा त्यात कोणतेही नविन बदल करायचे असल्यास याबाबत आपण ऑनलाईन परवानगी घेऊ शकतो. दरम्यान ही सुविधा सर्वच आधार केंद्रावर असेल असे नाही. याचबरोरबर यूआयडीएआयच्या वेबसाइटद्वारे आपली तारीख निश्चित करू शकता.
0 टिप्पण्या