घरगुती सिलेंडरचे भाव, जीएसटी शुल्क, स्टॅम्प ड्युटी नियमात होणार आजपासून बदल

घरगुती सिलेंडरचे भाव, जीएसटी शुल्क, स्टॅम्प ड्युटी नियमात होणार आजपासून बदल


नवी दिल्ली


 आरबीआयने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कर्जाचे हप्ते न भरण्यास मुदतवाढ दिली होती. हा कालावधी 31 सप्टेंबरला समाप्त होणार आहे. कर्ज मोरेटोरियमची सुविधा समाप्त होणार. मात्र आरबीआयने कर्जदारांसाठी लोन रिस्ट्रक्चरिंग स्कीम देखील आणली आहे. यासह अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे अनेक बदल १ सप्टेंबरपासून होणार आहेत.   यामध्ये घरगुती सिलेंडरचे भाव, जीएसटी शुल्क, जमिनीवरील स्टँप ड्यूटी शुल्क इत्यादी नियमांचा समावेश आहे. तसेच देशातील 8 कोटी किसान क्रेडिट कार्डधारकांना बँकेकडून घेतलेले कर्ज 31 ऑगस्टपर्यंत परत करावे लागेल. कर्ज परत न केल्यास त्यांना 7 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.  शेतकऱ्यांसाठी असे व्याज दर 9 टक्के आहे. मात्र सरकार यात 2 टक्के सबसीडी देते.


दर महिन्याला गॅस सिलेंडर्सच्या किंमतीबाबत समिक्षा होत असते. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्याने किंमत देखील वेगळी असते. ऑगस्टमध्ये मुंबईत 14.2 बिगर-सबसीडी गॅसची किंमत 610.50 रुपये होती. तर 19 किलो सिलेंडरची किंमत 1091 रुपये होती. तर दिल्लीत 14.2 किलो सिलेंडरची किंमत 594 रुपये आणि 19 किलो सिलेंडरची किंमत 1135.50 रुपये होती. सप्टेंबरमध्ये या दरात बदल होतील. जीएसटी भरण्यास विलंब झाल्यास 1 सप्टेंबरपासून व्याज लागेल. या वर्षीच्या सुरुवातीला जीएसटी भरण्यास विलंब झाल्याने 46000 कोटी रुपयांच्या थकबाकी व्याजाच्या वसूलीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच 1 सप्टेंबरपासून विमान प्रवास महागणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रवाशांकडून उच्च उड्डाण सुरक्षा शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रवाशांकडून 150 रुपयांच्या ऐवजी 160 रुपये घेतले जातील. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 4.85 डॉलर्सच्या ऐवजी 5.2 डॉलर्स घेतले जातील. जर तुमच्याकडे एचडीएफसीचे क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला 1 सप्टेंबरनंतर उशीरा पेमेंट केल्यास लेट पेमेंट चार्ज अधिक भरावा लागणार आहे. इंफिनिया कार्डसोडून सर्व कार्डांवर नवीन शुल्क लावले आहे. 50 हजारांपेक्षाच्या अधिकच्या रक्कमेवर 950 रुपयांच्या ऐवजी 1300 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच एअरलाईन्स इंडिगो आपली विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहे. 1 सप्टेंबरपासून प्रयागराज, कोलकत्ता ते सुरत मार्गावर सेवा सुरू होईल. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ही सेवा सुरू असेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या