लाॅकडाऊनचा गैरफायदा घेत जासईमधे दगड-मातीची चोरी
उरण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने चार महिन्याचा लाॅकडाऊन जाहीर केलेला असताना हजारो ब्रास दगड माती चोरी होते याचं जासई परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लाॅकडाऊन असल्याने जमिनीचे मालक घरातून बाहेर पडले नाहीत याचाच फायदा चोरट्यांनी घेतला आणि खाणकाम करून दगड आणि माती चोरली गेल्याच्या घटना उरण परिसरात घडल्या आहेत.
सर्वे नं. 71/अ/1/ब/1/5/1 आणि 71/1/ब/1/ब/3 ह्या मौजे जासई येथील विलास गणेश पाटील यांच्या मालकीच्या जमिनीतून हजारो ब्रास दगड आणि माती खाणकाम करून लाॅकडाऊनचा गैरफायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. अशी तक्रार विलास पाटील यांचा मुलगा श्री. विशाल पाटील यांनी तहसील कार्यालय उरण,जिल्हाधिकारी कार्यालय रायगड,आणि उरण पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. चोरट्यांचा लवकरच छडा लावून त्यांना जेरबंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी करावी अशी अपेक्षा व दाद विशाल पाटील यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या