"मोगरा फुलला" ब्रह्मांड कट्टयावर श्रावणी संगीतमय कार्यक्रम
ठाणे
लॉकडाऊनच्या काळातही श्रावण सरींचा "मोगरा फुलला" हा संगीतमय कार्यक्रम रविवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी. ब्रह्मांड कट्टा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संपन्न झाला. सुरोत्तमा संगीत अकॅडमीची सुगम संगीत, भक्ती संगीत, मराठी हिंदी चित्रपट गीते असलेल्या या मैफिलला अनेक श्रोत्यांनी दाद दिली. या लाईव्ह सुगम संगीताच्या कार्यक्रमात गायिका सौ.सुवर्णा दत्ता व तबला वादक श्री उत्पल दत्ता या दांपत्यांचा सहभाग होता. ब्रह्मांड कट्टयाचे फोटोग्राफर विनय जाधव यांनी फेसबुक व यूट्यूबच्या माध्यमातून रसिकांपर्यंत ही मैफिल पोहोचवली. तर ध्वनी प्रक्षेपण श्रैयश बुवा यानी सुरेख साथ दिली. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक राजेश जाधव तर आभार प्रदर्शन अध्यक्ष महेश जोशी यांनी पार पाडले.
श्रावणातील गाण्याची मैफिल म्हणजे पावसाचे आणि धरणीचे अनोखे नाते, हिरवं गार, आल्हादायक निसर्गरम्य वातावरण निर्मिती आणि ह्या वातावरणात नेहमीच आपल्याला प्रेमाची आठवण येते. अशीच एका संध्या निसर्गाच्या साक्षीने प्रियकराने प्रेयसीला दिलेले वचन "तिन्ही सांजा सखे मिळाल्या "या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि वातावरण संगीताचा रिमझिम वर्षाव सुरु झाला. "झीणी झीणी वाजे बीण" "ओ सजना बरखा बहार आयी" "केंव्हा तरी पहाटे " " नयनो में बदरा छाये" "रुपेरी वाळूत माडाच्या बनात" "नभ उतरू आलं " " कौत्सलेचा राम बाई, नाम स्वामींचे येता माझ्या ठायी रे,बाजे मुरलीया बाजे रे यांच्यासह " खेळ मांडियला वाळवंटी ठायी,अरे अरे ज्ञाना झाला सी पावन आदी गीतांची श्रोत्यांना भूरळ पडली.
कार्यक्रमात रसिकांच्या फर्माईशवर तबला वादक श्री. उत्पल दत्ता यांनी एक गझल सादर करून सगळ्यांना सुखद धक्का ही दिला. मैफलीच्या शेवट रसिकांची आवड व विनंती वरुन सुवर्णा दत्ता यांनी " दमा दम मस्त कलंदर " हे भजन गाऊन कार्यक्रमाची सांगता भक्तीभावाच्या ऊर्जेने केली. ह्या भावबंधनाना रसिकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले होते वैशाली अय्या ह्यांच्या शब्दात आणि मधुर आवाजातल्या निवेदनाने. तसेच रसमई संध्येला संगीत विशारद सुवर्णा दत्ता बरोबर तबला विशारद श्री. उत्पल दत्ता व की बोर्डवर विनय चेऊलकर यांनी साथ दिली.
0 टिप्पण्या