Top Post Ad

कळवा खारीगाव आरओबी उड्डाणपूल जानेवारीपर्यंत खुला होणार

कळवा खारीगाव आरओबी उड्डाणपूल जानेवारीपर्यंत खुला होणार



ठाणे


 खारीगाव येथील फाटक बंद करून या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याकरिता येथील स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा निवेदने दिली अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तरीही प्रत्यक्ष कामाला वेग येत नव्हता. रहिवाशांच्या प्रखर पाठपुराव्यामुळे अखेर कळवा आणि मुंब्रा दरम्यान ठाणे महापालिका आणि रेल्वे संयुक्तरित्या करत असलेल्या खारीगाव आरओबीचे काम जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खारीगाव येथील रेल्वे फाटक बंद होऊन रहिवाशांच्या जीवाशी होणारा खेळ थांबणार असल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.  


खारीगाव येथील बाजूस असलेल्या मैदानाचे या उड्डाणपुलामुळे दोन भागात विभाजन होत असल्यामुळे या प्रकल्पाला काही लोकांनी विरोध होता. तसेचपलिकडील बाजूस मफतलाल कंपनीची जमीन असल्यामुळे तेथेही उड्डाणपुल उतरवण्यासंदर्भात अडचणी होत्या. त्यामुळे रेल्वेने त्यांच्या हद्दीतील कामाला सुरुवात केली तरीठाणे महापालिकेच्या वाट्याच्या कामाला म्हणावी तशी गती येत नव्हती. अखेर यामध्ये समन्वय घडवून उड्डाणपुलाच्या खारीगाव बाजूकडील आरेखनात बदल करून मैदान वाचवले. त्यामुळे विरोध मावळला. तसेचपलिकडील बाजूस लागणाऱ्या जमिनीसाठी ठाणे महापालिकेने ४० कोटी रुपयांचा मोबदला दिल्यामुळे तेथील प्रश्नही निकाली निघाला. सर्व अडचणी दूर झाल्यामुळे कामाला वेगाने सुरुवात झाली होती. परंतुअचानक उद्भवलेल्या कोव्हिडच्या संकटामुळे पुन्हा कामाला खीळ बसली. कोव्हिडचे संकट आले नसते तर आतापर्यंत काम पूर्ण होऊन हा पूल सेवेत दाखल झाला असता. मात्रआता पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली असून खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता पाफळकरअन्य अधिकारी व पदाधिकारी यांनी सोमवारी या कामाची पाहणी केली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com