मुंबईतील डबेवाल्यांसाठी रोहीत पवार आले धावून

मुंबईतील डबेवाल्यांसाठी रोहीत पवार आले धावूनमुंबई 
लॉकडाऊन लागू होऊन  पाच महिन्याचा कालावधी उलटला आहे. कोरोनाचे संकट सर्वच क्षेत्रावर अद्यापही घोंघावत आहे. सर्वसामान्य जनतेचे हाल हाल होत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण हवालदील झाला आहे. अमेरिकेपर्यंत आपली छाप सोडणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांना देखील याची झळ बसली आहे. आज डबेवाल्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  मुंबईतील चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहोचवण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांचा व्यवसाय  पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे डबेवाले मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या अडचणी समजून घेत  मदत निधी उभा केला आहे. तसेच नागरिकांनाही मदतीचं आवाहन केलं आहे.


'मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे 5 हजार सदस्य असून, अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केलाय. आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर फोटोवरील नंबरवर संपर्क करावा,' असं आवाहन करणारं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.


 १३० वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातून पर्यटक, अभ्यासक मुंबईत येतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असायला हवी. त्यासाठी, मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत गत् वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरु झाले होते. मात्र कोरोनामुळे हा प्रकल्प रखडला असल्याने डबेवाल्यांच्या पदरी निराशा आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या