महापालिकेने राबविलेल्या ‘मिशन धारावी’चे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत.‘मिशन धारावी’मुळे रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आलं असून रविवार ९ ऑगस्ट रोजी फक्त 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत 5 तर दादर येथे 31 तर माहिममध्ये 17 नव्या रुग्णांची नोंद झाली. धारावीत आता 88 अॅक्टिव्ह रूग्ण, दादर सेथे 458, तर माहीम येथे 272 अॅक्टिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. मिशन धारावीमध्ये धारावीतल्या हजारो लोकांची टेस्ट करण्यात आली. आणि लक्षणे आढळलेल्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आलं. महापालिकेने धडक उपाय योजना केल्याने हे यश मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजना केल्यामुळेच धारावीत रुग्णांची संख्या घटली आल्याने प्रशासनाची चिंता कमी झाली आहे.
धारावीने कोरोनाला आवाक्यात आणले आहे, त्याची कारणे धारावीत राबणाऱ्या अशा अनेक स्वसंसेवी संघटना आणि त्यांनी महानगर पालिकेशी केलेलं सहकार्य आणि प्रत्येक गल्ली बोळात असलेली मंडळे, डॉक्टर्स आणि इथल्या लोकांनी दाखवलेली शिस्त आणि दुर्दम्य इच्छाशक्ती... या सगळ्यांनी कंबर कसून केलेली मेहनत यामुळे धारावीत कोरोना आवाक्यात आला आणि WHO त्याची नोंद घ्यावी लागली. धारावीत अनेक स्वयंसेवी संघटना आहेत ते लोकांशी जोडले गेलेले आहेत, तेथील लोक त्यांना आदराने वागवतात अनेक सरकारी कार्यक्रम लस टोचण्यापासून मोहल्ला कमिटी पर्यंतचे कार्यक्रम धारावी गेली अनेक वर्षे होत आहेत. मी प्रज्ञा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून तसेच माझ्या बरोबर अनेक लोक अशा संस्थामधुन कोरोना प्रादुर्भावाच्या काळात युद्धपातळीवर मदत कार्य तसेच प्रशासनाला सहकार्य करीत होतो. चळवळीतील अनेक कार्यकर्ते धारावीतून येतात. अनेक अभ्यास केंद्रे चालू असतात. या सर्वांच्या एकत्रित कार्यामुळे आज धारावी या महामारीपासून आटोक्यात आली असल्याचे मत धारावी बचाव कृती समितीचे अनिल शिवराम कासारे यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या