शहापूरच्या आदिवासींना रविवारी बहुजन संग्रामतर्फे शिधा- किराणा वाटप
ठाणे
लॉक डाऊनमुळे रोजगार बंद झालेल्या गरीब- श्रमजिवी लोकांना शिधा- किराणाचे वाटप करण्याचे बहुजन संग्रामने एप्रिलमध्ये हाती घेतलेले मदत कार्य सुरूच असून रविवारी ३० ऑगस्टला त्याचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. त्यात शहापूर तालुक्यातील दुर्गम गावांमधील शेकडो आदिवासी कुटुंबांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. लॉक डाऊनमधील मदत कार्याचा हा सातवा टप्प्या आहे. या मानवतावादी कार्यासाठी सार्वजनिक बांधकाम, जीवन प्राधिकरण, महसूल विभाग, महावितरण , महानगरपालिका येथील अधिकारी, कर्मचाऱ्यानी मोलाचे सहकार्य दिले आहे, असे बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
रविवारच्या मदत कार्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे विभागाचे कार्यकारी अभियंता अरुण निरभवणे , उप अभियंता विवेक विसपुते, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, रिपाइं (सेक्युलर) चे नेते रवी चंदने, शाखा अभियंता आर बी देगावकर, बी एस सगळगिळे, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा शेजवलकर, बहुजन संग्राम महिला आघाडीच्या नेत्या रंजना ताई कांबळे,बहुजन संग्राम चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव,ज्येष्ठ कामगार नेते दिलीप भाऊ थोरात,सचीव इंजि.जी.डी.मेश्राम,कोकण प्रदेशाध्यक्ष सुखदेव निकम ,ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक वाघ,स्वराज मशाल चे संपादक राजू कांबळे, बहुजन संग्राम चे महाराष्ट्र प्रदेश संघटक सुमेध निकम, वंदना कांबळे, माई कांबळे ,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहापुरच्या हरिश्चंद्रगड भागातील खेडवाडी, मुरबेवादी, आळवेवाडी या सारख्या वस्त्यांमधील आदिम कातकरी जमातीच्या लोकांना शिधा किराणाचे वाटप करण्यात येईल,अशी माहिती चिलगावकर यांनी दिली.
0 टिप्पण्या