एमजी मोटर इंडियाची झूमकारसह भागीदारी
मुंबई
एमजी मोटर इंडियाने भारतात व्हेइकल सबस्क्रिप्शनसाठी आघाडीचा पर्सनल मोबिलिटी मंच झूमकारसोबत भागीदारी केली आहे. याद्वारे एमजी मोटर आपल्या वाहन सबस्क्रिप्शन मंचासाठी झूमकारच्या एंड-टू-एंड टेक्नोलॉजी सोल्युशनचा लाभ घेईल. एमजीच्या नवीन वाहनांना झूमकारच्या परिवर्तनशील १२, २४ किंवा ३६ महिन्यांचे सबस्क्रिप्शन प्रोग्रामनुसार विस्तारून दिले जातील. झूमकार आणि एमजी मोटर पार्टनरशिप बुकिंग आणि वाहन लिस्टिंगसाठी ग्राहकांना २४x७ सपोर्टदेखील प्रदान करेल. ग्राहक अनुभवाचा भर ऑन-ग्राउंड फ्लीट मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स सपोर्ट, व्हेइकल शेड्युलिंग आणि ऑनबोर्डिंगसह कस्टमर सपोर्ट सर्व्हिसेससाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानास सक्षम करण्यावर असेल.
एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले, “ग्राहकांना या आकर्षक वाहन मालकीचा प्रस्ताव देण्यासाठी झूमकारसोबत हात मिळवणी केल्याचा आम्हाला आनंद आहे. आता ग्राहक आमची वाहने खरेदी करण्यापूर्वी त्यातील त्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांचा अनुभव घेऊ शकतील. सबस्क्रिप्शन मॉडेल भविष्यात एमजी वाहनांसाठी तसेच भारतातील वाहनप्रिय व्यक्तींसाठी अधिक सुलभ बनवले जाईल. झूमकारसोबतची आमची भागीदारी बाजारात मोठे आकर्षण निर्माण करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
इन्फिनिक्सने लॉन्च केले आयरॉकर इअरबड्स
मुंबई
स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्सने स्नोकोर या ब्रँडअंतर्गत आयरॉकर हे वायरलेस इअरबड तयार केले आहेत. स्टाइल, पॅशन आणि इमोशन हे ब्रँडचे डीएनए राखत आयरॉकर हे फ्लिपकार्टवर १४९९ रुपयांच्या लाँच किंमतीत उपलब्ध आहेत. प्रत्येक इअरबड्सचे वजन फक्त ४.६ ग्राम असून त्यात आयपीएक्स ४ असते, ज्यामुळे ते हलके बनतात. घाम आणि स्प्लॅश प्रूफ बनतात. यामुळेच ते आउटडोअर अॅक्टिव्हिटिजसाठी परिपूर्ण ठरतात. मग आपण जिममध्ये जॉगिंग करत असू की किकबॉक्सिंग, ते इअरबड्स कोणत्याही हालचालींमुळे घसरणार नाहीत.
स्नोकोर स्थिर कनेक्शनसाठी ब्लूटूथ ५.० ऑफर करते, २० हर्ट्झपेक्षाही कमी न होणारे अनमॅच्ड बास बूस्ट, स्लिप-प्रूफ स्नग फिट गूज एग डिझाइन, २० तासांपर्यंत जास्तीत जास्त प्लेटाइम देणारी दीर्घकाळ टिकणारी क्षमता , सहज वापरण्यासाठी मल्टी फंक्शन बटन कंट्रोल आदी सुविधा यात आहेत. अतिशय स्पष्ट श्रवण गुणवत्तेसाठी इअरबड्समध्ये हाय फिडेलिटी स्पीकर्स आहेत. त्यामुळे संगीत ऐकताना किंवा फोनवर बोलताना अप्रतिम अनुभव येतो. इअरबड्सला सपोर्ट करणा-या गूगल व्हॉइस असिस्टंटमुळे साध्या व्हॉइस कमांडद्वारे फोन नियंत्रित करता येतो.
इन्फिनिक्स इंडियाचे सीईओ अनिश कपूर म्हणाले, “इन्फिनिक्स हा आज मध्यम-श्रेणी स्मार्टफोन कॅटेगरीतील एक टॉप ब्रँड म्हणून ओळखला जातो आणि आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार म्हणून ऑडिओ सेगमेंटमध्ये वाढ करणे आवश्यकच आहे. म्हणूनच स्नोकोरची निर्मिती झाली. इन्फिनिक्सने फिस्ट (फर्स्ट इन सेगमेंट टेक्नोलॉजी) सुविधा दिली आहे. ज्याद्वारे ग्राहकांना आकर्षक किंमतीत प्रीमियम वैशिष्ट्यांचा अनुभव मिळतो. इन्फिनिक्स ब्रँड अंतर्गत स्नोकरने आमच्या दृष्टीकोनात तसेच या क्षेत्रातील सर्वात आवश्यक वेगळी वैशिष्ट्ये यात दिली आहेत. हे विशेषत: तरुण वर्गाला संतुष्ट करण्यासाठी असून त्यांनी अतिशय स्पष्ट ध्वनीचा अनुभव आणि मनोरंजन तसेच फिटनेससंबंधी कामाचा आनंद घेता येतो.”
0 टिप्पण्या