पक्षपाती कव्हरेजचा निषेध म्हणून अनेक पत्रकारांचा राजीनामा
ऑनलाईन (बेलारूस)
बेलारुसमध्ये अलीकडेच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. मतदानादिवशी बेलारुसच्या सरकारी टीव्ही चॅनेलने राष्ट्राध्यक्ष अॅलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या समर्थनार्थ असलेल्यांना कव्हरेज केले, मात्र विरोधकांना जाणीवपूर्वक डावलले. तसेच सरकारी हिंसाचार झालेली फुटेज दाखवली आणि निदर्शन करणाऱ्या आंदोलकांवर आरोप केले. या शिवाय लोकांना सहभागी होऊ नये असा इशारा देत असल्याचा आरोप केला. या पक्षपाती कव्हरेजचा निषेध म्हणून येथील अनेक पत्रकारांनी राजीनामा दिला आहे. सरकारी टीव्हीच्या स्टाफमधील सुमारे १०० हून अधिक जण कार्यालयातून बाहेर पडुन आंदोलनात सहभागी झाले. इतकेच नाही, तर त्यांनी पुढील आंदोलनाची घोषणा केली. इतर आंदोलकांप्रमाणेच आम्हीही सुद्धा निष्पक्ष निवडणूक घेण्याची मागणी करत आहोत. त्याचबरोबर ज्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्यांची मुक्तता करावी. अशी या कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे.
बेलारुसमध्ये झालेल्या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारी टीव्ही चॅनेलविरोधात आंदोलन पुकारले. वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे फुल कव्हरेज दाखवा अशी मागणी टीव्ही चॅनेलसमोर जमलेल्या आंदोलकांनी केली. हजारो विरोधी पक्षांच्या समर्थकांनी बेलारुसमधील मिन्स्कमध्ये फलक झळकावत लोकांना सत्य दाखवा अशी मागणी केली. बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अॅलेक्झांडर लुकाशेन्को यांनी ९ ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत एकतर्फी विजयाचा दावा केल्यानंतर आंदोलन पेटले आहे. या आंदोलनाचे कव्हरेज तेथील सरकारी टीव्हीने केलेले नाही. निवडणूक निकालावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तेथील केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष अॅलेक्झांडर लुकाशेन्को १९९४ पासून सत्तेत आहेत. त्यांना नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ८० टक्के मते मिळाली. त्यांचे विरोधी उमेदवार स्वेतलाना तिखानोवस्काया यांना अवघी १० टक्के मते मिळाली. तथापि मतगणना योग्य पद्धतीने झाली असती, तर ६० ते ७० टक्के मतांच्या पाठिंब्याने जिंकले असते असे त्यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या