...तर मुख्यमंत्र्यांना बाहेर पडू देणार नाही
औरंगाबाद
9 ॲागस्ट रोजी क्रांती दिन आहे. क्रांती दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय झाला नाही तर सरकारच्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलनााला बसू, मुख्यमंत्र्यांना बाहेर पडू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी दिला होता. औरंगाबाद येथे मराठा समाजाच्या न्याय्य हक्काच्या आंदोलनाची मोठी तयारी सुरू आहे. सरकार विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ही तयारी केली जात आहे. त्यामुळे राज्यात सत्तेवर आलेल्या महाआघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरातील महत्वाच्या क्रांती चौक येथून या आंदोलनाला शनिवारी सकाळीच सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, अजून आंदोलकांना पोलिसांनी अटकाव केलेला नाही. आंदोलनात आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी घेतली आहे. गेल्या वेळी झालेली मराठा क्रांती मोर्चाची सुरवात अशीच औरंगाबादेतून झाली होती. नंतर या आंदोलनानं व्यापक स्वरूप घेतलं होतं. त्यामुळे राज्य सरकारने या आंदोलनाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर हे आंदोलन सरकारसाठी डोके दुःखी ठरू शकते. मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी करू नका. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांना नोकरीच्या आश्वासनाची सरकारने अंमलबजावणी करायला हवी. उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनी 30 तारखेला 42 आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना भेटीला बोलवलं होतं. पण, आम्ही बैठकांना गेलो नाही. असंही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
0 टिप्पण्या