Top Post Ad

अवास्तव वीज बिले रद्द करा- खासदार बारणे यांची उर्जामंत्र्यांकडे मागणी

मीटर रीडिंग घेऊन बिलांची आकारणी करावी, अवास्तव वीज बिले रद्द करा; खासदार बारणे यांची उर्जामंत्र्यांकडे मागणी



उरण


- महावितरण कंपनीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन मीटर रीडिंग घेतले नाहीत.  अंदाजपंचे बिले दिली आहेत. यामुळे बिले जास्त रकमेची आली आहेत. गेल्या चार महिन्यातील मीटर रीडिंग घेऊन बिलांची आकारणी करावी. अवास्तव दिलेली वाढीव बिले रद्द करावीत, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.  
याबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. एखाद्या नागरिकाने जास्त बिल भरले असेल. तर, ते पुढील बिलात समाविष्ट केले जाईल, असे आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिल्याचे बारणे यांनी सांगितले.


खासदार बारणे यांनी आज  मंत्रालयात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली. अवास्तव वीज बिले आल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांना सांगितले. वीज बिले कमी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या महावितरण कंपनीच्या वतीने नागरिकांना घरगुती लाईट वापराची बिले मीटर रीडिंगव्दारे दिले जाते. कोरोना लॉकडाऊन काळात मीटर रीडिंग न घेता अंदाजे लाईट बील ग्राहकांना देण्यात आली आहेत.  बील हे अवास्तव प्रमाणात देण्यात आल्याने  नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. कोरोना काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून त्यातच लाईट बील न वापरलेल्या विजेचेही आले आहे. ही बील मीटर रिडींगप्रमाणे  मिळावे ही माफक अपेक्षा ग्राहकांची आहे.


महावितरण कंपनीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन मीटर रीडिंग घेतले नाहीत. अंदाजपंचे बिले दिली आहेत. यामुळे बिले जास्त रकमेची आल्याने जनतेत नाराजी आहे. गेल्या चार महिन्यातील मीटर रीडिंग घेऊन बिलांची आकारणी करावी. वाढीव बिले कमी करावीत. काहींना एक लाख, दोन लाख रुपयांची बिले आली आहेत. नागरिक बिले भरायला तयार आहेत. पण, जेवढी वीज वापरली तेवढेच बिल भरणार अशी नागरिकांची भूमिका आहे.  मीटर रिडींग प्रमाणे वीज बील आकारून नागरिकांना देण्यात यावीत. अवास्तव बील आकारणी केली आहे. ती रद्द करून सुधारित  बीले ग्राहकांना देण्यात यावीत अशी मागणी खासदार बारणे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे  केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com