शिवप्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण 

शिवप्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण उरण
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्याचा तळागाळात प्रसार व प्रचार व्हावा या दृष्टिकोनातून सामाजिक कार्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठान उरण तालुका या संघटनेमार्फत राष्ट्रीय अध्यक्ष विजयभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील पुनाडे धरण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आंबा काजू, कोकम इत्यादी विविध प्रकारच्या झाडांची लागवड  करण्यात आली.


 संघटनेचे अध्यक्ष सुदेश पाटील, उपाध्यक्ष हेमंत पवार, पत्रकार विठ्ठल ममताबादे, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, आगरी कोळी कराडी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विशाल पाटील, कल्पेश कोळी, प्रेम म्हात्रे, मोहित वर्तक, हेमंत कोळी, सुरज पवार, आकाश पवार, ओमकार म्हात्रे, शुभम ठाकूर, कुमार ठाकूर, साहिल म्हात्रे, गणेश म्हात्रे, नितेश पवार, सागर म्हात्रे आदी शिवभक्त यावेळी उपस्थित होते.  सोशल डिस्टन्स पाळत, शासनाच्या  नियमांचे पालन करत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.पुनाडे परिसरात लावलेली झाडे जगण्यासाठी संघटनेतर्फे नियमित देखभाल सुद्धा करण्यात येणार आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या