आवडता झेंडा फडकवा आणि आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा
औरंगाबाद
आता लॉकडाऊन पाळू नका, सर्व व्यवहार सुरु करा, शासनाचे लॉकडाऊन मान्य करु नका, ज्यांना जो झेंडा आवडतो तो झेंडा आपल्या गॅलरी अंगणात फडकवा, आणि त्यातून आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा, असं असं आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केलं. ते औरंगाबादेत बोलत होते. यावेळी त्यानी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला. तसेच भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनाही चिमटे काढले. “भाजपला लग्न करण्याची घाई झालीय, त्यांना बायको हवीय, पण ती भेटत नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सत्तास्थापनेसाठी भाजपला जोडीदार हवा आहे, त्या अनुषंगाने ही मिश्किल टीका केली.
केंद्र आणि राज्याकडे पॉलिटिकल गट्स किंवा त्यांची हिम्मत नाही. काही नेते हे जातीचे नेते आहेत, काही नेते धर्माचे नेते आहेत. शासनाचा रिपोर्ट आहे की कोरोनाविरोधात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे, देशात पाच टक्के लोक हे व्हरनेबल कॅटगेरीत आहेत. या लोकांची प्रतिकार शक्ती वाढवणं ही प्राथमिकता असली पाहिजे, 5 टक्के लोकांसाठी 95 टक्के लोकांना वेठीस धरणं हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. 5 टक्के लोकांना वाचवण्यासाठी इतर लोकांना आपण मारत आहोत अशी स्थिती आहे. काही लोक भूकबळीने मरत आहेत सर्वसामान्य माणसांना आवाहन आहे. की चक्रव्यूहात अडकलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला रस्ता दाखवण्याची गरज आहे, लोकांना विनंती आहे की सगळी दुकाने उघडी करा, रिक्षावाल्यांनी व्यवसाय सुरु करावेत, पब्लिक ट्रान्सपोर्टमधील लोकांनी कामावर हजर व्हावे. सरकारने 80 कोटी लोकांना अन्नधान्य दिल्याचा दावा केला, पण अन्नधान्य कुणालाही भेटलं नाही. वंचित बहुजन आघाडीची हाक, शासनाचे लॉकडाऊन मान्य करु नका, जनजीवन सुरळीत सुरु करा. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधा सुरु करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
0 टिप्पण्या