खंडणी विरोधी पथकच खंडणी वसुली करण्याचे काम करतात- मोनिका पानवे


ठाणे खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी-कर्मचारी

खंडणी विरोधी पेक्षा खंडणी वसुली करण्याचे काम करतात-

महिला सक्षमीकरण प्रमुख (जिजाऊ  संस्था)  मोनिका पानवे

 

ठाणे आयुक्तांना दिले पत्र ; दोषींवर कारवाईची मागणी 


 

ठाणे

ठाणे शहर खंडणीविरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी हे आपले परिक्षेत्र सोडून ठाणे ग्रामीण, पालघर जिल्हयामधील व्यावसायिकांना विनाकारण त्रास देत आहेत. गेले अनेक वर्ष अधिकारी - कर्मचारी एकाच विभागात काही राजकीय पुढाऱ्यांच्या कृपाआर्शिवादाने त्याच जागेवर कार्यरत असून खंडणी विरोधी पेक्षा खंडणी वसुली करण्याचे काम करत आहेत,  अशा आशयाची तक्रार जिजाऊ  संस्थेच्या महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका पानवे यांनी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फ़णसाळकर यांना पत्राद्वारे केली आहे. 

 

राजकारणात आपल्या पक्षातील व विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना संपविण्यासाठी  अधिकारी खोट्या केसेस करून अडकवून मदत करत आहेत. या अधिकाऱ्यांची सकाळची हजेरी वरदहस्त असलेल्या नेत्यांच्या घरी असते. यापूर्वी कोणी तक्रार वा जाब विचारला तरीही ही टोळी तक्रारी मागे घ्यायला लावतात. अशा समाजघातक प्रकृतीचा नाश होणे काळाची गरज आहे व समाजामध्ये पोलिसाबाबत असलेला आदर कायम राहण्यासाठी या खंडणीखोर अधिकाऱ्यांस आपण इतरत्र बदली करून त्यांनी नेमलेल्या खाजगी दलाल व सर्व अधिकाऱ्यांचे गेल्या ५ वर्षातील केसेस फेरतपासणी करून पिडितांना न्याय मिळवून द्यावा व कर्मचारी - अधिकारी यांच्या नातेवाईकांच्या असलेल्या संपत्तीची तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका पानवे यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या