Top Post Ad

आता लक्षणे नसल्यास कोरोना चाचणी नाही... राज्य सरकारचे नवे आदेश

आता लक्षणे नसल्यास कोरोना चाचणी नाही... राज्य सरकारचे नवे आदेश



मुंबई : 


 पाच महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता राज्य सरकारकडून मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉकची घोषणा करत उद्योगधंदे आणि वाहतूक व्यवस्था हळूहळू सुरू केले जात आहे. त्याचबरोबर बाजारपेठाही खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र यावर खबरदारी म्हणून सरसकट कोरोनाची चाचणी केली जात होती. पण, आता जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तरच त्याची चाचणी करण्यात यावी अशी सूचना राज्य सरकारने काढली आहे. केंद्र सरकारनेही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या कराव्यात असे आदेश दिले होते.  जर व्यापारी, प्रवासी व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नसतील तर त्यांची कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य सरकारने नव्याने दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.


याआधी स्वॅब घेऊन कोरोनाची चाचणी ही केली जात असल्यामुळे 24 तासानंतर या चाचणीचा अहवाल मिळतो. या चाचणीसाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहे. तर दुसरीकडे आता अँटिजन चाचणी केली जात आहे. यात पाचशे रुपयांमध्ये अवघ्या 20 मिनिटांमध्ये रिपोर्ट प्राप्त होत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची लगेच ओळख पटत आहे. त्यामुळे संशयितांना क्वारंटाईन करण्यात येत आहे तर कोरोनाबाधितांना तातडीने कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येत आहे. पण, तरीही राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  आता ज्यांची कोरोनाची चाचणी आवश्यक आहे, अशा व्यक्तींचीच अँटिजन चाचणी केली जाणार आहे. एखादी व्यक्ती जर कोरोनाबाधित रुग्णांच्या हायरिस्क संपर्कात आली किंवा विदेशातून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला असेल किंवा गर्भवती महिलेला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले असेल तर दोघांचीही कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. ज्या ठिकाणी सोईसुविधा नाही अशा ठिकाणी अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे.


दरम्यान, आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यांतर्गत आणि आंतरराज्य माल आणि प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याबाबतच्या या सूचना आहेत. आम्ही या मार्गदर्शक सूचनांची गंभीरपणे नोंद घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. देशमुख यांनी हे ट्विट केल्याने राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतूक सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.


केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी अनलॉक ३ बाबत सर्व राज्यांचं लक्ष वेधलं आहे. एका पत्राद्वारे अजय भल्ला यांनी आठवण करुन दिली आहे की  राज्यांनी स्थानिक पातळीवर लादलेल्या निर्बंधांमुळे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वस्तू आणि सेवांची वाहतूक, पुरवठा साखळी, आर्थिक कामकाज बिघडणे आणि बेरोजगारी वाढणे असे परिणाम होत आहेत,  आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतीही बंधने नसतील, असं केंद्राने आपल्या अनलॉकिंगच्या नियमावलीत स्पष्टपणे सांगितलं आहे.. नागरिकांना प्रवासासाठी किंवा राज्याची सीमा ओंलाडून मालवाहतूक करण्यासाठी कोणतीही वेगळी परवानगी, ई-पास यांची आवश्यकता नाही, राज्यांनी निर्बंध कायम ठेवले तर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गृह मंत्रालयाच्या नियमांचं हे उल्लंघन असेल, असा इशारा केंद्राने दिला आहे.. कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवासी वाहतूक सुनिश्चित केली जावी, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com