Top Post Ad

रुटरचा गेमिंग आणि ई स्पोर्ट्स क्षेत्रात प्रवेश / कर्झा टेक्नोलॉजीची निवड

रुटरचा गेमिंग आणि ई स्पोर्ट्स क्षेत्रात प्रवेश


मुंबई 
भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स कम्युनिटी प्लॅटफॉर्म रुटरने मे महिन्याच्या सुरुवातीला  गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स स्ट्रीमिंग सुविधा सुरू केली होती. या स्ट्रीमिंग टूल्सद्वारे यूझर्सला या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट ऑ़डिओ-व्हिडिओ क्वालिटी आणि फीचरसह मोबाइल अॅपसह त्यांच्या पीसीमध्ये कोणताही गेम स्ट्रीम करण्याची सुविधा मिळते. या प्लॅटफॉर्ममध्ये देशभरातून ५०,००० पेक्षा जास्त आशादायी गेमिंग स्ट्रीमर्स जोडले गेले. स्ट्रीमिंगची सुरुवात झाल्यानंतर एक महिन्यापेक्षाही कमी वेळेत, १.८ ते २ दशलक्षांपेक्षाही जास्त रुटर अॅप डाऊनलोड केले गेले. यासोबत हा भारतात गेमिंग समुदायासाठी कॅटेगरी लीडर बनत आहे.


रुटरचे संस्थापक पियूष म्हणाले, “ या साथीमुळे आम्हाला आमचा ईस्पोर्ट्स आणि गेमिंग प्लॅन वेळेआधीच सुरु करण्याची सुवर्णसंधी मिळाली. आम्ही प्रसार आणि अनुभवातील उत्कृष्ट फीचर्ससह विक्रमी वेळेत आमची टेक्नोलॉजी लाँच केली. आतापर्यंत आम्ही यशस्वीरित्या स्पोर्ट्समध्ये एक समुदाय तयार करत, हे काम आणखी पुढे नेत गेमिंग क्षेत्रात काहीतरी मोठे बनवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रुटरला भारतात सर्वाधिक पसंतीचा कंटेंट प्लॅटफॉर्म बनण्यात मदत मिळाली आहे. हा प्लॅटफॉर्म देशातील १६ ते ३० वर्षे वयोगटातील विविध गेमिंग प्रेक्षक आणि स्पोर्ट्स फॅन्सचे मनोरंजन करत आहे. सध्या आयपीएलची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात ऑडियो आणि व्हिडिओ सेगमेंटमध्ये एकमेव यूझर-जेनरेटेड कंटेंट प्लॅटफॉर्म असल्यामुळे रुटरला २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट प्रदर्शन करण्याची आशा आहे.”


 


महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२० मध्ये कर्झा टेक्नोलॉजीची निवड


मुंबई
मुंबईतील फिनटेक स्टार्टअप कर्झा टेक्नोलॉजीजची महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२० अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या २४ विजेत्यांमध्ये निवड झाली आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या उपक्रमाअंतर्गत ही निवड करण्यात आली. विजेत्यांना महाराष्ट्र सरकारकडून १२ महिन्यांच्या कालावधीत पथदर्शी उपक्रमात पाठबळ आणि मार्गदर्शन मिळणार आहे. सरकारी डेटाबेसच्या स्मार्ट वापराद्वारे फिनटेक सोल्यूशन विकसित करण्याच्या प्रयत्नांतून कर्झा, ग्राहकांना अत्याधुनिक उत्पादने वितरीत करण्यात मदत करीत आहे. के:स्कॅन आणि लिटिगेशन बीआय हे डिजिटल मेहनत घेणारे व्यासपीठ असून ते बँक, कॉर्पोरेट्स आणि सरकारी संस्था यांना तत्काळ परिश्रमपूर्वक अहवाल देण्याकरिता बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे फसवणूक कमी होते.


अचूक माहिती पुरवण्यासाठी मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून ७५० पेक्षा जास्त सार्वजनिक स्रोतांचा डेटा एकत्र करून त्याचे विश्लेषण केले जाते. नियमाक आणि लिटिगेशन फायलींचे विश्लेषण करून, या साधनांद्वारे लाखो व्यवसायांवर समग्र अहवाल मिळवता येऊ शकतात. याद्वारे वित्तीय संस्था, सरकारी संस्था आणि इतर विश्वसनीय असेसमेंट सोल्यूशन्सला मदत केली जाऊ शकते. या उपक्रमाद्वारे  समकालीन संस्थात्मक आव्हानांना तोंड देण्याकरिता कर्झाच्या एआय संचलित अत्याधुनिक सोल्युशन्सद्वारे सोयीस्कर परिश्रम करणे, जोखीम कमी करणे आणि तत्काळ प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली.  कर्झा टेक्नोलॉजीचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार शिरहट्टी म्हणाले, “ उद्योजकांच्या वृद्धीची शक्यता वाढवण्यासाठी हा एक आदर्श प्लॅटफॉर्म असून यासाठी राज्यातील संस्थांकडून मदत आणि सहाय्य मिळते. या यशामुळे कर्झा टेक्नोलॉजीज खूप आनंदीत आहे. तसेच टेक सोल्यूशन्ससाठी महाराष्ट्र राज्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. यामुळे जनता, सरकार आणि वित्तीय संस्थांना फायदा होईल.”टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com