उपजिल्हा रुग्णालय शहापूरचा भोंगळ कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा

उपजिल्हा रुग्णालय शहपूरचा भोंगळ कारभार
रिपाईने केली डॉ. प्रमोद निरवणे यांची निलंबनाची मागणीशहापूर
शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार प्रकरणी डॉ. प्रमोद निरवणे यांना निलंबित करावे आशा मागणीचे लेखी निवेदन शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालय शहापूर अधिक्षक डॉ. बनसोडे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वासिंद शहर शाखेच्यावतीने देण्यात आले. डॉ. प्रमोद निरवने यांना तत्काळ निलंबित करावे अन्यथा रिपाईतर्फे तीव्र आंदोलन  करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला. यावेळी पक्षातर्फे ,महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड ,पदवीधर शिक्षक मतदार संघ कोकण प्रदेश अध्यक्ष अमोल गायकवाड , वासिंंद शहर अध्यक्ष प्रविण गायकवाड ,  उद्योजक सचिन घेगडे , उपाध्यक्ष मंगेश जगताप आदी उपस्थित होते. 


जेएसडब्लू कंपनी वासिंद येथील कर्मचारी बापूराव बिराजदार हे बुधवारी(दि.२६) रोजी त्यांच्या घरी हृदयविकाराने मयत झाले. त्यांचे कुटुंबीयांनी त्यांना शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले.परंतु चोवीस तास उलटून देखील शवविच्छेदन न झाल्याने तसेच डॉ. निरवणे हेच शवविच्छेदन करतील आणि ते आता कोविड सेंटर जोंधळे कॉलेज येथे असल्याचे सांगण्यात आले. दोन तीन तास  होऊन सुद्धा डॉ. निरवणे आले नाही. म्हणून रिपाई कार्यकर्त्यांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन चौकशी केली मात्र डॉ. निरवणे तेथे नसल्याचे समजले. त्यावेळी रिपाई कार्यकर्त्यांनी डॉ. निरवणे याना फोन केला मात्र निरवणे यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.  उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे डॉ.निरवने ड्यूटीला जाऊन हजेरी लावुन गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी दिवसभर त्यांची वैयक्तिक कामे करत होते हे सिद्ध झाले.  उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथील कर्मचारी यांचे पितळ उघडे झाले. शेवटी  रिपाई कार्यकर्त्यांनी दबाव टाकत डॉ. म्हस्के यांच्याकडून मयत इसम बापूराव बिराजदार उमरगाव, सोलापूर यांचे शवविच्छेदन करून घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या