Top Post Ad

नॅान कोविड रूग्णालयांवर विशेष पथकाची नजर

नॅान कोविड रूग्णालयामध्ये कोविड रूग्णांवर उपचार होत आहेत का
तपासणी करण्याचे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांचे आदेश
– विशेष पथकांची नियुक्तीठाणे


ठाणे शहरामध्ये कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने साथरोग प्रतिबंधित कायद्यातील अधिनियमातील तरतुदींतंर्गत ठाणे कोविड रूग्णालय, सिव्हिल हॅास्पीटल याच्यासह खासगी रूग्णालये कोविड रूग्णालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत.  ठाणे महानगरपालिकेने घोषित केलेल्या कोविड रूग्णालयांव्यतिरिक्त नॅान कोविड रूग्णालयांमध्ये कोविड रूग्णांवर उपचार करण्यात येतात का याची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत. यासाठी वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
      तथापि महापालिकेने घोषित केलेल्या कोविड रूग्णालयांशिवाय नॅान कोविड रूग्णांलयामध्ये कोविड रूग्णांवर उपचार करण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॅा. मुरूडकर यांना अशा रूग्णालयांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. सदर रूग्णालयांची तपासणी करण्यासाठी वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके नॅान कोविड रूग्णालयांना भेट देवून त्या ठिकाणी कोविड रूग्णांवर उपचार घेत आहेत का याची तपासणी करणार आहेत.


राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ७ ऑगस्ट रोजी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले असून तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या आदेश दिले. रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने २१ मे २०२०रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे.  मात्र खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.


वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे की नाही याची खातरजमा या भरारी पथकामार्फत करण्यात येईल.  खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी केली जाईल.  खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमावी.  आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी.  महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे यासर्व बाबींची तपासणी करावी. अशी कामे भरारी पथकामार्फत करण्यात येणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com