Top Post Ad

कोरोनानंतर पुन्हा लोकायुक्तसाठी लढ्याची सुरुवात करणार- अण्णा हजारे

कोरोनानंतर पुन्हा लोकायुक्तसाठी लढ्याची सुरुवात करणार- अण्णा हजारेअनेक वर्षे रखडलेले लोकपाल विधेयक मंजूर झाले आहे, आता महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये लोकायुक्त नियुक्त करावा यासाठी आमचा लढा सुरू राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी याबाबत सकारात्माक भूमिका दर्शविली असून कोरोनाविरोधातील लढा संपल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यानी सांगितले. जीवनाचे ध्येय जनतेसाठी या समाजासाठी  लढायचे हे ठरवले आहे त्यामुळे आपण वयाच्या ८३ व्या वर्षी देखील पुढील लढा लढण्यासाठी मैदानात उतरायला तयार आहोत असे अण्णानी सांगितले. 


आनंद विश्व गुरूकुल विधी महाविद्यालय व आनंद विश्व गुरूकुल जेष्ठ रात्र महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित विधिलिखीत या ऑनलाईन चर्चासत्रात अण्णा हजारे बोलत होते. जेष्ठ पत्रकार शशिकांत कोठेकर यानी अण्णांची दिलखुलास मुलाखत घेतली त्यावेळी आपला जीवनप्रवास व विविध लढे, आंदोलने याबाबत अण्णानी चर्चा केली. विधिलिखीत चर्चासत्राचे हे ९९ वे सत्र होते. सुरूवातीला प्रास्ताविक डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यानी केले तर, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सुयश प्रधान यानी ऑनलाईन मुलाखतीच्या तांत्रिक बाबी सांभाळली. शारदा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे हे देखील उपस्थित होते.


माहिती अधिकार कायदा, ग्रामसभा कायदा, राजकारणी नेते, मंत्री, अधिकारी, पुढे झालेली बदनामीचा दावा,  भ्रष्टाचार विरोधी विधेयक ते लोकपाल साठी दिल्लीतील लढा यावर अण्णा भरभरून बोलले. त्यावेळी माझ्या सोबत लढणारे कोणी मुख्यमंत्री झाले, कोणी मंत्री झाले तर कोणी राज्यपाल झाले. त्यानी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली त्यामुळे आता मला अश्या लोकांची गरज नाही, आपण त्यांच्याशी फोनवर देखील आता बोलू इच्छित नाही असे अण्णानी स्पष्ट केले.


आत्तापर्यंत २० उपोषण केली. ६ मंत्र्याना, ४५० हून अधिक भ्रष्ट सरकारी अधिकारी याना घरी पाठवले. हे लोकशाही सरकार लोकांचे आहे. लोकांना येथील कायद्याचा लाभ मिळावा यासाठी माझा लढा सुरूच राहणार आहे. मला तरूण पिढीकडून खूप अपेक्षा आहेत. माझ्या प्रत्येक लढ्यात जनतेने सहकार्य केले. लोकपाल विधेयक केंद्रात मंजूर झाले. राज्यातील भ्रष्टाचार संपुष्टात यावा असे वाटत असेल तर, लोकायुक्त नियुक्ती झाली पाहिजे. याबाबत सध्याच्या सरकारशी मी पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली असून सध्या कोरोनाशी लढण्यात सरकार गुंतले असून त्यानंतर आपले सरकार निर्णय घेईल असे आश्वासन त्यानी दिल्याचे अण्णानी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com