सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एकत्रीकरणासाठी ठाण्यात बैठक संपन्न

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एकत्रित कार्य करण्याचा मानसमुंबई


Covide-19 च्या महामारीत जगाची काय अवस्था झाली त्यापेक्षा भारताची काय स्थिती आहे.... आणि त्यातही बहुजन वर्गाची काय अवस्था आहे याबद्दल आता बहुतेक समाजवर्ग ज्ञात झाला आहे. मात्र कळतंय पण वळत नाही अशी अवस्था आजही अनेकांची आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक समाज घटकाला त्याच्या अस्तित्वाची आणि स्वत्वाची जाणीव झाली. मात्र नेहमीच दलितत्वाच्या चादरीत गुंडाळून ठेवणाऱ्या बौद्ध समाजाची ससेहोलपटच झाली असल्याचे मत अनेक समाजधुरीणांनी व्यक्ती केले.  ठाण्यातील विविध संघटनातून काम करणाऱ्या घटकांनी एकत्र येऊन भविष्यात सामाजिक बांधिलकी जपून एकत्र येण्याचे आवाहन करित बैठक आयोजित केली होती. ठाण्यातील दादोजी कोंडदेव येथील प्रबोधन टाईम्सच्या कार्यालयात आज १ ऑगस्ट रोजी ही बैठक संपन्न झाली. प्रमोद इंगळे,  प्रा.चंद्रभान आझाद, भास्कर वाघमारे, रविंद्र चांगो शिंदे, तसेच प्रभाकर जाधव, कुणाल बागुल, नरेंद्र नाशिककर, प्रल्हाद मगरे, गोविंद पाठारे,  किरण कांबळे, सुबोध शाक्यरत्न आदी मान्यवरांनी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत अनेकांनी भविष्यात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून ठाणे महानगर पालिका क्षेत्रात एकत्रित कार्य करण्याचा मानस व्यक्त केला. 


आज लॉकडाऊनच्या काळात समाजातील काही घटकांची फार हेळसांड झाली आहे. यामध्ये माध्यमवर्गीय समाज आहे. मात्र त्याचवेळी आपल्यातील अधिकारी वर्ग, इंजिनिअर्स, डॉक्टर्स, उच्चशिक्षित उच्चपदी असलेला वर्ग मात्र या समाजाशी फारकत घेत असल्याचे चित्र दिसून आले. या उच्चपदी असलेल्या वर्गाला एकत्रित करून त्यांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण करणे गरजेचे आहे. एकीकडे संघटीत तर दुसरीकडे असंघटीत. माध्यमवर्गीय झोपडपट्टीमधील वर्ग काहीसा संघटीत आहेच. मात्र मोठ् मोठ्या सोसायट्या, टॉवरमधून राहणारा वर्ग हा अद्यापही असंघटीत आहे. या असंघटीत वर्गाला संघटीत करून एकत्रीत करण्याचे काम यापुढे या सामाजिक बांधिलकी उपक्रमाच्या माध्यमातून करण्याकरिता आपल्याला कार्य करायचे असल्याचे प्रमोद इंगळे यांनी बैठकीमागील प्रयोजन सांगितले. यावर बैठकीस उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आपआपले मत व्यक्त करीत या भूमिकेला जाहीर पाठिंबा दर्शविला. यापुढे सामाजिक बांधिलकी स्विकारून समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास करणे आणि उद्योगधंदे, व्यवसायास पाठबळ देण्यासाठी प्रयत्नशील राहणे यावर समाजाचे भवितव्य अवलंबून असल्याने त्यासाठी कार्य करण्याचे आश्वासन दिले.


या बैठकीत दोन पिढ्यांमधील विचारसरणी प्रकर्शाने जाणवली. एकीकडे भास्कर वाघमारे यांनी या सर्व उपक्रमासाठी आपण प्रसिद्धी पत्रके, पोस्टर्स काढून प्रचार प्रसार करून लोकांना जागवण्याचे, जमवण्याचे काम करायला हवे असा विचार मांडला तर त्याच वेळी त्यांचे चिरंजीव प्रियेश वाघमारे यांनी डिजीटलच्या माध्यमातून हे काम तात्काळ होऊ शकेल असे मत मांडले. यासाठी स्वतंत्र अॅपची आवश्यकता असून याद्वारे आपण प्रत्येक समाज घटकाला आपल्या कार्याबद्दल तात्काळ माहिती उपलब्ध करून देऊ शकु. असे स्पष्ट मत प्रियेशने मांडताच सर्वांचे त्यावर एकमत झाले. लवकरच या अॅपची निर्मिती करण्याचे सर्वानुमते ठरले. 


समाजातील एक घटक जो आज पांढरपेशा वर्गात जगत आहे. तर दुसरा घटक दर दिवसाच्या भाकरीसाठी रडत आहे. अशा अवस्थेत यामधला मध्यबिंदू कोण साधणार? यासाठी विचार विनिमय करणे गरजेचे आहे. समाजातील अनेक गरजुंना लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने अनेकजण अडचणीत सापडले. यावर आता मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. मात्र सामाजिक विश्वासार्हता गमावल्यामुळे समाज एकसंघ व्हायला अडचणी येत आहेत. कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्य करण्यास पुढे आलेल्या व्यक्तीला प्रथम कोणत्या पक्षाचा आहेस असा प्रश्न विचारल्याने  राजकीय चर्चेच्या पलिकडे आपले कार्य जात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात यावर ठोस उपाययोजना व्हावी असे मत पत्रकार सुबोध शाक्यरत्न यांनी व्यक्त केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA