कोट्यावधी रुपये रस्त्यावरील खड्ड्यात

कोट्यावधी रुपये रस्त्यावरील खड्ड्यात, नेमेचि येतो पावसाळा

 


 

ठाणे

 

ठाण्यातील खड्डे आणि  त्याचा ठाणेकरांना होणारा त्रास ही बाब आता नित्याचीच झाली आहे. केवळ पावसाळा आला की खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. काही दिवस ठाणेकर सोशल मिडीयावर आपला त्रास, संताप व्यक्त करतात. काही पक्ष संघटना आंदोलन करतात. त्यावर ठाणे महापालिकेकडून मुलामा दिला जातो आणि पुन्हा पुढच्या पावसाळयातील खड्ड्यांची वाट पहात सर्व यंत्रणा गप्प होते. ही बाब आता ठाणेकरांना नवीन नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकरिता गत् वर्षी सुमारे ३ करोडोहून अधिक रुपयांचे टेन्डर पास होऊन देखील यावर्षी देखील ठाणेकरांना प्रतिवर्षाप्रमाणे खड्ड्यांचा सामना करावा लागलाच. रस्त्यांच्या कामासाठी ठाणेकरांनी भरलेल्या टॅक्समधून एवढे रुपये खर्च होत असून देखील त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने ठाणेकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.  येणाऱ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिका क्षेत्रातील खड्डे बुजवण्याचे काम सुरुच असल्याचे चित्र आहे. मात्र खड्डे अद्यापही जैसे थेच आहेत. 

 

 


 


 

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कापूरबावडी नाका याठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.तसेच कापूरबावडी हनुमान मंदिराच्या वर बांधण्यात आलेला पूल देखील खड्ड्यांमुळे बंद झालेला आहे, सध्या परिस्थितीला बघणारा कोणी वाली राहिला नाहीये, स्थानिक प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या ठिकाणी विशेष लक्ष दिले पाहिजे, या ठिकाणी खड्ड्यांमुळे नेहमी अपघात होत असतात असे स्थानिकांचे म्हणणे आहे त्यामुळे संबंधित अधिकारी,प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी तत्काळ सदर समस्येवर तातडीने लक्ष द्यावे व भविष्यात होणारे अपघात टाळावे,जनसामान्यांच्या जीवाशी खेळ करणे बंद करावे अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे.

 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या