जि.प.शाळा नवघर धोकादायक स्थितीत.
विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या जीवितेला धोका.
शाळेची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थ मंडळ नवघरची मागणी.
एखादी जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण ? ग्रामस्थांचा प्रशासनाला सवाल.
उरण
नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथील जिल्हा परिषदेची शाळा धोकादायक व जीर्ण अवस्थेंत असल्याने मंगळवार दिनांक 25/08/2020 रोजी ग्रामस्थ मंडळ नवघर यांच्या वतीने अध्यक्ष जयप्रकाश नारायण पाटील यांनी ग्रामस्थ मंडळाच्या कार्यकारी पदाधिका-यां समवेत नवघर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक किरण केणी यांना नवघर गावात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची इमारत ही अतिजिर्ण अवस्थेत आहे त्यामुळे त्या शाळेच्या इमारतीत शाळा भरवण्यास धोकादायक असून जोखमीचे आहे असे निदर्शनास आणून दिले. शाळेची पाहणी करून शाळेची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन त्यांनी ग्रामसेवक केणी यांना दिले.
आता लवकरच शाळा सुरु होणार आहेत. यदा कदाचित शाळा पडली किंवा शाळेचा एखादा भाग पडला तर विद्यार्थी तसेच शिक्षक वर्गाला दुखापत होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवाय सदरची शाळेची इमारत कित्येक महिने बंद असल्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. याचा ग्रामस्थ मंडळ नवघर यांनी गांभीर्याने विचारविनिमय केला असून लोकसहभागातून शाळेची डागडुजी (रिपेरींग) हि ग्रामपंचायत नवघर, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे इजिंनियर यांच्याच मार्गदर्शनात करून विद्यार्थाना बसण्यास योग्य करण्याचे ग्रामस्थ मंडळाने ठरवले आहे.त्या पार्श्वभूमीवर आशयाचे निवेदन ग्रामपंचायत नवघर कार्यालयात जाऊन ग्रामस्थ मंडळाच्या वतीने देण्यात आले असून त्याची एक प्रत
मा. जिल्हाधिकारी रायगड,जिल्हा परिषद रायगड- अलिबाग, पंचायत समिती उरण यांनाही देण्यात आलेली आहे.नवघर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक किरण केणी यांना निवेदन देताना ग्रामस्थ मंडळ नवघरचे अध्यक्ष-जयप्रकाश नारायण पाटील, कार्याध्यक्ष-राजेश श्रीराम पाटील, खजिनदार-ज्ञानेश्वर मधुकर भोईर,सहखजिनदार-समाधान भालचंद्र तांडेल, सेक्रटरी-अमित अर्जून जोशी उपस्थित होते.आता या निवेदना नंतर प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
0 टिप्पण्या