Top Post Ad

यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
महाड
महाडमध्ये २५ ऑगस्ट रोजी साळीवाडा नाका काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही इमारत कोसळली. १० वर्षांपूर्वी बांधलेल्या ५ मजली असलेल्या या इमारतीचे ३ मजले पत्त्या सारखे कोसळले. घटनास्थळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. केवळ सात ते आठ वर्षात इमारत कोसळली असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता शिंदे यांनी वर्तवली. या इमारतीचा बांधकाम व्यावसायिक आणि ज्या अधिकाऱ्यांनी इमारत बांधकामाला परवानगी दिली, अशा सर्वांवर कारवाई केली जाईल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांना दिले आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.


तारिक गार्डन ही दोन विंगची इमारत असून, त्यात ४१ फ्लॅट होते. त्यांपैकी १८ फ्लॅट हे रिकामे होते. इमारतीत ४८ कुटुंबे राहत होती. इमारतीच्या ढिगाऱ्यातून वृत्त हाती येईपर्यंत ९ जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर १० जण मृतावस्थेत सापडले आहेत. अद्यापही मदत कार्य सुरु असून इमारतीचं मलबा हटवला जात आहे.  पडलेल्या इमारतीच्या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारूक काझी आणि युनूस शेख अशी त्यांची नावं आहेत. अद्याप दोघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्यासोबतच पोलिसांनी आरसीसी कन्सल्टंटचे बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, महाड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड तसेच अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी हि इमारत काही मिनिटे हलत होती. काही लोकांना वाटलं कि भूकंप झाला. त्यामुळे अनेकांनी इमारतीतून बाहेर पळ काढत सुरक्षित स्थान गाठले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.  इमारत बांधणाऱ्या बिल्डरने केवळ एका वर्षात ही इमारत उभी केली. यासाठी वापरण्यात आलेले साहित्य हलक्या प्रतीचे असून इमारतीचे कामही तकलादू केल्यामुळेच ही दुर्घटना घडली, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.


पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकरहे घटनास्थळावर तातडीने हजार झाले. त्यांनी तात्काळ सर्व यंत्रणा हलविली. मेडिकल कॅम्प साठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती तातडीने नियुक्ती करण्यात आली. जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी माणगावमधील राऊत हॉस्पिटल, निकम हॉस्पिटल, राठोड हॉस्पिटल, बेडेकर हॉस्पिटल, वक्रतुंड हॉस्पिटल, पटेल हॉस्पिटल, माळी हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटल, पाटणकर हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल, कामेरकर हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय आणि महाड शहरातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसेकर हॉस्पिटल नांदगावकर हॉस्पिटल, म्हामुणकर हॉस्पिटल, डॉ. फैजल देशमुख हॉस्पिटल भूलतज्ञ, आर्थोपेडिक, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ याना सज्ज करण्यात आले. 


पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या समन्वयातून एमजीएम हॉस्पिटल कळंबोली, बेलापूर डी.वाय.पाटील हॉस्पिटल तसेच ज्युपिटर हॉस्पिटल सज्ज करण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महाड जवळील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ रक्तदानासाठी आवाहन केले. म्हणता म्हणता १०० बॅग रक्त जमा झाले. प्रशासकीय पातळीवर तातडीने मदत पोचविण्यात आली. एनडीआरएफचे फाटक दाखल होईपर्यंत स्थानिकांनी मदत कार्याला सुरवात केली होती. मदत कार्य वेगाने व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथकेही आज सकाळी ७ वाजता दाखल झाली. त्यांनी एनडीआरएफ टीमसोबत मदतकार्यास सुरूवात केली. पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे रात्रीच महाडला रवाना झाले होते. त्याचवेळी त्यांनी महापालिका आयुक्त ड़ॉ. विपिन शर्मा यांना ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथके घटनास्थळी मदतकार्यासाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com