डाऊरनगर येथे बेकायदेशीर टॉवर उभे.
शासनाला फसवून लाखोंचा महसूल बुडविणारे गावगुंड पुढारी व भ्रष्ट शासकीय अधिकारी आहेत तरी कोण ?
बेकायदेशीर टॉवर विरोधात मोरेश्वर भोईर यांचे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.
उरण
उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे 60 मध्ये व सर्वे नंबर 61 मध्ये सिडको कडून किंवा संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता गावगुंड पुढाऱ्याच्या मदतीने व भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन हेमंत परशुराम भोईर यांनी बेकायदेशीर कोणतेही कायदेशीर परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभे केले आहे. यामुळे शासनाची फसवणूक तर झालीच आहे शिवाय शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.त्यामुळे संबंधितावर त्वरित कायदेशीर कारवाई करून बेकायदेशीर मोबाईल टॉवरला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मोरेश्वर माया भोईर यांनी श्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री,आयुक्त कोकण विभाग,जिल्हाधिकारी रायगड, रायगड जिल्हा परिषद, ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र शासन, सिडको कार्यालय बेलापूर यांच्याकडे याबाबत लेखी पत्रव्यवहार करून केली आहे.
उरण मधील शेतकऱ्याच्या भातशेतीच्या जमिनी रायगड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नवी मुंबईसाठी सिडकोला संपादित करण्यात आल्या. त्यापैकी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 60 व सर्वे नंबर 61 मध्ये बेकादेशीर मोबाईल टॉवर उभे केले जात असून गावगुंड असणाऱ्या पुढाऱ्यांच्या मदतीने हेमंत परशुराम भोईर यांनी बेकायदेशीर टॉवर उभे केले आहे. ही शासनाची सरळ सरळ फसवणूकच आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. यात काही शासकीय भ्रष्ट अधिकाऱ्यांचेही हात गुंतले आहेत. त्यांचीही चौकशी व्हावी. मोबाईल टॉवर जवळच लहान मुलांची शाळा आहे. यामुळे लहान मुले व शिक्षक यांच्या जीवितेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बेकायदेशीर टॉवर उभे करणाऱ्या संबंधितांवर त्वरित योग्य ती कारवाई करावी व बेकायदेशीर टॉवरला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी आगरी कराडी कातकरी समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर माया भोईर यांनी केले आहे
0 टिप्पण्या