LPG च्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

LPG च्या किमतीत वाढ होण्याची शक्यतानवी दिल्ली


तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG घरगुती गॅस सिलेंडर आणि हवाई इंधनाच्या किमतीची घोषणा करतात. मागील काही महिन्यांपासून इंधनाच्या किमतीत वाढ झालेली दिसली. ऑगस्टला LPG च्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे आगामी काळात  बँकींग व्यवहारात 6 मोठे बदल होणार आहेत. हे बदल  बँक खातं, स्वयंपाकाचा गॅसपासून गाडीच्या विम्याच्या हप्त्यांपर्यंत होणार आहेत.


रोख रकमेचा व्यवहार आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बँकांनी  ग्राहकांच्या बँक खात्यात कमीत कमी ठेवीवर शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. या बँकांमध्ये 3 मोफत व्यवहारांनंतर शुल्क आकारलं जाणार आहे. या शुल्क आकारणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra bank) आणि आरबीएल बँकेचा (RBL Bank) समावेश आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सेव्हिंग खातेधारकांना मेट्रो आणि शहरी भागात कमीत कमी 2,000 रुपये ठेव ठेवणं आवश्यक आहे. ही रक्कम आधी 1,500 रुपये होती. या रकमेपेक्षा कमी बॅलन्स असेल तर मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, अर्ध-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात 20 रुपये प्रति महिना शुल्क आकारलं जाणार आहे.


ई-कॉमर्स कंपन्यांना आपल्या उत्पादनाच्या मूळ देशाची माहिती सांगणं आवश्यक असणार आहे. विक्रीसाठीचं उत्पादन कुठं तयार झालं, कुणी बनवलं इत्यादी तपशीलांची माहिती देणं यात अपेक्षित आहे. अनेक कंपन्यांनी याधीच ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यात फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि स्नॅपडील सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने (DPIIT) सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना नव्या उत्पादनांची यादी त्यांच्या निर्मिती देशाच्या माहितीसह पाठवण्यास सांगितली आहे. मेक इन इंडिया प्रोडक्टला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या