भा.ज.पा.सरकारच्या JEE-NEET परिक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन
ठाणे
सद्यस्थितीत सूरू असलेल्या कोरोना च्या भयंकर परिस्थितीमध्ये केंद्रातील भा.ज.पा.सरकारने JEE-NEET च्या परिक्षा घेण्याच्या निर्णयामुळे देशभरातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून एक मोठी समस्या निर्माण झाली असून देशभरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं याचा निषेध दर्शविला जात आहे,ठाण्यातही याचे तिव्र पडसाद उमटले असून ठाण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज ठाणे शहर(जि.)काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने केली*
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य व भविष्याची चिंता व्यक्त करत या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे. एसएसयुआयनेही केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिलेला आहे. कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यामध्ये ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कोरोना प्रादुर्भावचे सोशल डीस्टींगचे पालण करीत मोठ्या प्रमाणात यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते याप्रसंगी बोलताना अँड. विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की,JEE-NEET च्या परिक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने केद्र सरकार व त्या त्या राज्यातील सरकार यांनी एकत्रित बैठका घेउन निर्णय घ्यावा असे निर्देश दिले आहे,पंरतु राज्यातील सरकारना विश्वासात न घेता केद्रातील भा.ज.पा.शासीत सरकारने हुकुशशाही प्रमाणे या परिक्षा घेणारा निर्णय घेतला एकीकडे संपूर्ण जग कोरोना प्रादुर्भाव संकटाचा सामना करत असताना सकारात्मक पद्धतीने व सामोपचाराने निर्णय घेणे अपेक्षित असताना केंद्रातील भा.ज.पा.सरकारचा संपूर्ण देशात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली या निर्णयाला विरोध करण्यात येत आहे आम्ही या निर्णयाचा पूर्ण निषेध नोदवीत असून लवकरात लवकर या परिक्षा घेणारा निर्णय रद्द करावा व या परिक्षा घेण्याचा कालावधी जास्तीत जास्त वाढवावा अशी
मागणी विक्रांत चव्हाण यांनी शेवटी केली.
0 टिप्पण्या