Top Post Ad

मंडल आयोग ,ओबीसी आणि आगरी कोळी कराडी भंडारी सागरपुत्र.                                                  

मंडल आयोग ,ओबीसी आणि आगरी कोळी कराडी भंडारी सागरपुत्र.  


                                               


कालच मंडल आयोग दिन साजरा करण्यात आला.मंडल आयोगाची अमलबजावणी व्हावी यासाठी देशाचे नेतृत्व करणाऱ्या ओबीसी तरुणांची काय स्थिती आहे? याचे मी दिवसभर निरीक्षण केले.मी ओबीसी नेता आहे ,असे म्हणवून घेणे सोपे आहे.परन्तु आपापल्या ओबीसी जातीत जागृती आणणे खूप कठीण काम आहे.महात्मा जोतिबा फुले सावित्री माई फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर या ओबीसी विचारवन्त आणि महापुरुष यांना त्यांच्या साहित्यासह ओबीसी तरुणाला त्यापासून दूर ठेवण्यात उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यशस्वी होत आहेत.ओबीसी आरक्षण मंडल आयोग ओबीसी जण गणना या साऱ्या आंदोलनाचे नेतृत्व पत्रकार जगन्नाथ कोठेकर, अड जनार्दन पाटील आणि लोकनेते दि बा पाटील यांनी केले होते हे आगरी कोळी कराडी तरुणांना आजही पुन्हा पुन्हा सांगावे लागतेय.एकूण आरक्षण हा विषय मागासवर्गीयांना स्वतःच्या हक्क अधिकाराचा आहे असे वाटणे, हे वैदिक हिंदुत्व विरोधी आहे असा मोठा गैरसमज आहे.आम्ही कट्टर हिंदू आहोत मागास नाही ही फार मोठी अधश्रद्धा वर्तमानातील सर्वच आगरी आमदार खासदार आणि नगरसेवक राजकीय नेत्यांमध्येही आहे.त्यामुळे स्वतःच्याच आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या आगरी तरुणांना मी कसा दोष देऊ ?त्यांनी दिलेल्या शिव्या या अज्ञानातून आल्यात,हे अज्ञान दूर करणे हे सर्वच आरक्षणवादी कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.                      


दि बा पाटील हे आगरी ओबीसींचे नेते होते मग ते जात न मान नाऱ्या डाव्या मार्क्सवादी विचारांचे कसे असतील? असला तत्वज्ञानी अभ्यास करायला कुणाला वेळच नाही.त्यामुळे एक इंची भगवा टिळा कपाळी लावून हिंदुत्ववादी अज्ञान गौरवाने मिरविणे सोपे आहे.           अर्थात दि बा पाटील दत्ता पाटील यांनी असे टिळे गंडे दोरे का बांधले नाहीत?याचा तरुणांनी अभ्यास करावा!  1990 च्या काळात ओबीसी जण गणना व्हावी यासाठी आगरी समाजाने फार मोठे आंदोलन केले आदरणीय दिवंगत शाम म्हात्रे यांचा यात ऐतिहासिक पुढाकार होता.आगरी हे मागास आहेत म्हणजे क्षत्रिय (मराठा )ब्राह्मण वैश्य उच्चवर्णीय नाहीत हे समजावण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला नाही.ओबीसी पेक्षा अधिक जास्त पिचलेल्या एससी एसटी मातंग वडार चर्मकार आदिवासी यांच्याबरोबर आमचे जवळचे नाते दाखविणे जोपर्यंत आगरी नेतृत्वाला जमत नाही तोपर्यंत हा विषय स्वतःच्या ओबीसी जातीला समजविणे अवघड आहे.फडणवीस ठाकरे पवार हे ओबीसी जातींचे उद्धारकर्ते होऊच शकत नाहीत कारण ओबीसी जातीच्या आरक्षण,जण गणना यात वरील उच्चवर्णीय नेत्यांचा राजकीय आर्थिक जमीनदारी सरंजामी करिष्मा संपून ओबीसी लोकांचा राजकीय सामाजिक उदय होणार आहे.कोरोना सारख्या महामारीत रामजन्मभूमी भूमिपूजन करणाऱ्या पंत प्रधान मोदींनी देशाला सांगितले की लोकडाऊन ही तुमच्यासाठी आणीबाणी असेल उच्चवर्णीयासाठी नाही.अयोध्येतील राम मन्दिर र्निर्मिती साठी सर्वाधीक प्राणांचे बलिदान देणाऱ्या ओबीसी तरुणांना राम मंदिर ट्रस्ट मध्ये एकही जागा नाही,हे आहे वास्तव रामराज्य..हे आहे संविधान विरोधी मनुराज्य किंवा शिवसेना भाजपा विश्व हिंदू परिषदेचे 'हिंदुराष्ट्र'!      


1984 साली सिडको विरोधात लढताना आगरी कोळी कराडी समाजाच्या पाच हुतात्म्यांच्या त्यागाने दि बा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुबंई पनवेल उरणच्या ओबीसींना करोडपती बनविले !प्रत्येकास 2 कोटी रुपयांचे साडे बारा टक्के सिडको भूखंड पुनर्वसनात मिळवून दिले,आणि राम जन्म भूमी आंदोलनाने भागवत मोदी अडवाणी ठाकरेंनी ओबीसींना मूर्ख बनविले? असा थेट सवाल प्रणित पाटील ,सर्वेश तरे हे तरुण करतात.. तेव्हा पाच हुतात्मे आणि आगरी कोळी कराडी समाजाच्या त्यागाला संघर्षाला न्याय मिळतोय अशी आशा वाटू लागलीय.राम मंदिर आणि रा स्व संघाच्या रामराज्यात आगरी कोळी कराडी ओबीसी तरुणांना काडीचाही वाटा नाही! हे सांगणारे, ओबीसी आंबेडकरी कार्यकर्ते रोजच्या जीवनातले हजारो मानवी तास, कष्टाचे लाखो रुपये आणि साधने लावतात. तेव्हा समाजाने त्याची किमान दखल घ्यावी अशी अपेक्षा असते.सिडको विमानतळ प्रकल्प,वरळी सी लिंक,शिवस्मारक,शिवडी न्हावा सेवा प्रकल्प,गावठाण कोळीवाडा जमीन हक्क यात काम करणाऱ्या लोकांसमोर आपल्या जातीचे ओबीसींचे प्रश्न असतात हे तरुणांनी ओळखले पाहिजे.जय भीम चा अर्थ आमच्या ओबीसी तरुणांना साऱ्या भारतात न्याय देणारी बुद्धिवादी विज्ञानवादी चळवळ असा आहे.भारतीय संविधानात ओबीसी इतर मागासवर्गीय हा शब्द प्रयोग भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचे फलित आहे.त्यांना संविधान बनविताना आणि आजही विरोध करणारे हे आगरी कोळी कराडी भंडारी ओबीसींचे खरे शत्रूच आहेत.


मुबंई ठाणे पालघर रायगड येथील आगरी कोळी कराडी भंडारी समाजाला त्यांच्या घरा गावठाणे कोळीवाडा आणि वापरातील जमिनी बरोबरच सरकारी जमीन कायद्यावे ध्यावी .हे  ओबीसी मंडळ आयोगाने केलेल्या शिफारसी मधील एक महत्वाची शिफारस आहे.ती रस्त्यावरील जण आंदोलन करूनच साध्य होणार आहे.नवी मुबंई विमानतळ प्रकल्पात 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्यक तरुण तरुणीला स्वतंत्र घर देण्याचा कायदा असूनही एका कुटूंबास एक घर तेही घराच्या पायाच्या तीनपट देणारे सिडको ,आणि दहा गाव संघर्ष समिती आमदार खासदार राजकीय नेते हे किती मोठे शत्रू आहेत हे 2013 चा नवा भूसंपादन कायदा आणि मंडळ आयोगाचा अभ्यास करूनच कळणार आहे.आज  कोणत्याही आगरी कोळी कराडी ओबीसी तरुणाला मुबंई परिसरात घर घेण्यासाठी 2 कोटी रुपये लागतात अर्थात तारुण्य नासवावे लागते हा माझा स्वतःचा अनुभव आहे,हे लक्षात घेता बाबासाहेब आंबेडकर यांची अर्थात जय भीम वाल्यांची चळवळ हीच निवारा शिक्षण आरक्षण देणारी चळवळ आहे हे सहज लक्षात येते,गावठाण विस्तार,मच्छिमार पुनर्वसन, नवी मु विमानतळ प्रकल्पातील केरुमाता बौद्ध लेणी हे सारे लढे आमच्या तरुणांच्या सुखासाठीच आहेत,छप्पर असलेल्या परन्तु भिंती नसलेल्या घराला पुनर्वसन नाकारणारी सिडको , हा आगरी कोळी शास्त्रज्ञांनी,आर्किटेक्ट, वकील प्राध्यापक इंजिनियर आपला बौद्धिक पराभव करतेय.हे समजून घ्यावे.आपल्या अशिक्षित मच्छिमार शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त आई वडिलांनामूर्ख बनवतेय हे लक्षात घ्यावे.          


आगरी कोळ्यांचे सर्वपक्षीय नेत्ये हे सामाजिक चारित्र्य गमावून, दलालांच्या भूमिकेत सिडको समोर विधानसभा येथे जागा अडवून बसले आहेत.त्यांना बाहेर काढून नेतृत्व तरुणांनी हाती घ्यावे.      चारशे वर्षापूर्वीचे वडाचे झाड वाचविणारे शिवसेनेचे युवा नेते मा. मंत्री महोदय आदित्य ठाकरे हे तरुण राजकीय नेतृत्व मोदी पेक्षा भयानक आहेत.कोळीवाडा गावठाणे याना गलिच्छ वस्त्या ठरवून ते बिल्डरांना देऊन ब्रँडेड गाड्या उधळणार्या या बिल्डर नेत्यांना खडा सवाल करणारे वेसावकार विकास कोळी ही नव्या युगाच्या तरुणाईची शान आहे.खरे हिरो आहेत.आमचा जमीन हक्क, कोळीवाडा गावठाणे यांच्यासाठी लढणारी  एकविरा मातृसत्ताक वेसावची तरुण पारू आता समोर यायला हवीय!..


जय मातृसत्ताक केरुमाता,जय एकविरा.


राजाराम पाटील... उरण रायगड... 8286031463


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com