ऑनलाईन घरगुती सजावट स्पर्धा डिझायर फाऊंडेशनचा INTERNET उपक्रम
ठाणे
डिझायर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव महिला व बालविकास कल्याण प्रज्ञाताई यांचे संकल्पनेतून ऑनलाईन घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. घरगुती गणपती सजावट / थीम्ससाठी संस्थेतर्फे पहिल्या तीन विजेत्यांना 5000 / - रुपये पर्यंत चे रोख पारितोषिक देण्यात येणार सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी डिस्क्रिप्शनसह आपण तयार केलेल्या सजावट आणि थीमचे व्हिडिओ पाठवा,९० सेकंदांची मर्यादा. आपल्या आरास, देखाव्यासह कौटुंबिक छायाचित्र. आपण पाठवलेले व्हिडिओ आमच्या YouTube चॅनेल, फेसबुक पृष्ठ आणि आमच्या वेबसाइटवर पोस्ट केला जाईल जो आपल्याला सूचित केला जाईल. आपल्या पोस्ट केलेल्या व्हिडिओंवर आलेल्या Likes वर निर्णय घेतला जाईल. विजेत्यांचे फोटो प्राइम न्यूजपेपर आणि न्यूज चॅनेल्समध्येही दाखवण्यात येतील, तरी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
डिझायर फाउंडेशन स्वयंसेवी संस्था नेहमीच विविध पैलूंनी समाजाच्या विकासासाठी ओळखली जाते. सार्वजनिक उत्सवांच्या, सणाच्या निमीत्ताने प्रत्येकजण आपली प्रतिभा आणि कला जपत असतो. डिझायर फाउंडेशनने नेहमीच याचे कौतुक केले आणि प्रोत्साहन दिले आहे. दरवर्षी डिझायर फाउंडेशन घरगुती गणपती आरास स्पर्धा आयोजित करतो पण यावर्षी सजावट पाहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाच्या घरात पोहोचू शकत नाही. यावर्षी संस्थेने " इंटरनेटचा राजा " बाप्पा आले ऑनलाइन. ही नवीन संकल्पना मांडली आहे. JANATA xPRESS media चा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नोंदणीसाठी तुमचे संपूर्ण नाव,संपर्क क्रमांक 8286777708 या क्रमांकावर पाठवावे. असे आवाहन संस्थेचे चंद्रशेखर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या