भारतीय जनता पार्टी,कोपरखैरणे तालुका तर्फे घंटानाद आंदोलन.
उरण
पुनश्च हरिओमचा नारा देत सुरु झालेल्या "मिशन बिगिन" मध्ये मंदिर मात्र बंदच असल्याने या विरोधात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या आदेशानुसार कोपरखैरणे तालुक्याच्या वतीने कोपरखैरणे येथील श्रीसाई बाबामंदिराच्या बाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अंकुश(बाबा) कदम यांनी राज्यात मदिरालय सुरु आहे पण देवालय नाही" ही संतापजनक बाब असल्याचे मत व्यक्त करत "लवकरात लवकर राज्यातील मंदिर उघडली नाहीत तर आंदोलन तीव्र करण्यात येईल" असा इशारा दिला. यावेळी भाजपा कोपरखैरणे तालुका सरचिटणीस मयूर धुमाळ, भाजयुमो तालुका अध्यक्ष विजय धनावडे,ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत जाधव,समाजसेवक रवींद्र वाळुंज,वॉर्ड अध्यक्ष रघुनाथ नारायणकर, तुषार सुळके, उमेश जगताप व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच दिव्यातील गणेशमंदिरा बाहेर झालेल्या आंदोलनात . ठाणे शहर जिल्हा कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे दिवा शीळ मंडळ सरचिटणीस युवराज यादव, ओबीशी अध्यक्ष रोशन भगत, नागेश पवार, मूर्ती मुंडे, अजय सिंग, जीलाजित तिवारी, श्रीधर पाटील, अनुराज पाटील,रामबाबू सोनी,आदी संह सर्व भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मुंबईतील सायन कोळीवाडा विभागातील हनुमान मंदिर समोर, तमिल संगम रोड, नामदेव कोळी मार्ग, सायन येथे 'घंटानाद आंदोलन' आमदार कॅप्टन आर. तामिल सेल्वनजी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
0 टिप्पण्या