Top Post Ad

... तर तुम्ही कायमचे निवांत होण्याची वेळ आलेली आहे

फक्त इंडियन रेल्वेला होणारा डीझेल पुरवठा पूर्वी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि ओएनजीसी कडून व्हायचा तो आता परममित्र मुकेश अंबानींच्या रिलायन्स कडून होतोय.
बाकी सगळं निवांत आहे.


फक्त रेल्वे मंत्रालयाला आणि सगळ्या रेल्वे यंत्रणेला पूर्वी दूरध्वनी आणि मोबाईल सेवा बीएसएनएल पुरवायचं , आता जिओ पुरवणार आहे.
बाकी सगळं निवांत आहे.


फक्त ११२ विमानतळावर इंटरनेट सेवा पुरवायला बीएसएनएल होतं त्या ऐवजी आता ते काम जिओ करणार आहे.
बाकी सगळ निवांत आहे.


फक्त सीमाभागात आणि नक्षलग्रस्त भागात खास सुरक्षा दलांसाठी मोबाईल आणि इंटरनेट सेवा पुरवायचं काम पूर्वी बीएसएनएल करायचं आता जिओ करणार आहे.
बाकी सगळं निवांत आहे.


भारतातल्या सगळ्या ग्रामपंचायत ऑप्टिक फायबरने जोडण्याचं काम बीएसएनएल करत होतं ते जिओ आणि एअरटेल करणार आहे.
बाकी सगळ निवांत आहे.


तोटा वाढल्याने बीएसएनएलच्या ५४००० कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देऊन बीएसएनएल मोडीत काढायचा प्लान फक्त निवडणुका आहेत म्हणून लांबणीवर पडलाय.
बाकी सगळं निवांत आहे.


आयडीबीआय बँकेला गाळातून वर काढायला १२००० कोटींचा तोटा एलआयसीने आपल्या बोकांडी घेतलाय.
बाकी सगळं निवांत आहे.


एचएएल पण हळूहळू बीएसएनएलच्या मार्गावर आहे. खर्च भागवायला १००० कोटी कर्जाऊ घ्यावे लागलेत , १४ वर्षात अशी वेळ आलेली नव्हती. मात्र राफेलचा काम कुणाला दिलेय हे सांगायला हव का ?
बाकी सगळं निवांत आहे.


बेरोजगारीचा दर गेल्या ४६ वर्षात सगळ्यात जास्त आहे. गेल्या पाच वर्षात तीन कोटी शेतमजुरांचा रोजगार गेलाय. नोकऱ्यांची आश्वासनं तर हवेतच आहेत.
बाकी सगळं निवांत आहे.


नोटाबंदी नंतर सगळा काळा पैसा नष्ट झालाय. मात्र लक्षावधी भाजपचे चौकीदार असताना २०१४ च्या तुलनेत कितीतरी जास्त रोकड आतापर्यंत निवडणुकीत पकडली गेलीय. निवडणूक आयोगाची आकडेवारी १५८२ कोटींची आहे.
बाकी सगळं निवांत आहे.


शेतकरी आत्महत्या ,शेतीमालाचे भाव, दुष्काळ, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था ह्या विषयावर बोलणारा इसम पप्पू आहे; मात्र कॉंग्रेस जाहीरनाम्याला पाकिस्तानी कट म्हणणारा, कब्रस्तान-स्मशान करणारा, हिंदू मुस्लीम करणारा , मुफ्तीताई सोबत युतीच सरकार करूनही विरोधकांना फुटीरवादी म्हणणारा इसम लोकांना देशाचा मसीहा वाटतोय.
बाकी सगळं निवांत आहे.


करदाते वाढले आहेत, कर संकलन वाढले आहे, जीएसटी यशस्वी झाले आहे, असं म्हणता म्हणता गेल्या सत्तर वर्षात कोणीही आरबीआयच्या  देशाच्या रिझर्वला कोणीही धक्का लावला नाही; तर आता त्यातून 28 हजार कोटी कोणालाही न विचारता, न सांगता चोरटेपणाने काढून घेण्याची वेळ आली आहे.
बाकी सगळं निवांत आहे.


सगळ वाचूनही तुम्हाला पण निवांत वाटत असेल तर तुम्ही कायमचे निवांत होण्याची वेळ आलेली आहे.


आनंद शितोळे यांच्या फेसबुक वॉलवरून



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com