Top Post Ad

 नाका कामगारांची पालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत त्वरीत नोंदणी करण्याची मागणी

 नाका कामगारांची पालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत त्वरीत नोंदणी करण्याची मागणी



नाशिक 
BOC अंतर्गत नोंदणी झालेल्या बांधकाम मजुरांना लॉकडाऊन काळातील सरकारी अर्थसहाय्य मिळावे, या करिता  बहुजन असंघटीत मजदुर युनियनच्या केंद्रीय कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र सरकारशी सातत्याने संपर्क व संवाद साधून आहे. नाशिक परिसरातील बांधकाम चालु असलेल्या अनेक ठिकाणी भेट दिली असता, असंख्य मजुर नोंदणी विना राहीलेले राहीलेले आढळुन आलेले आहे. अनेक मजुरांची नोंदणी न झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांपासून ते मजुर वंचित राहीलेले आहेत. त्यांना तात्काळ मदत मिळावी, त्याकरिता नाशिक जिल्ह्याच्या वतीने कामगार ऊपआयुक्त जि.जे .दाभाडे नाशिक विभाग यांना  निवेदन देण्यात आले.


 नाशिक महानगर पालिका क्षेत्रात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पावरिल काम करित असलेल्या मजुरांची (नोंदणी न झालेले मजुर) BOC अंतर्गत त्वरीत नोंदणी करावी. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील नाका कामगारांची पालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत त्वरीत नोंदणी करण्याच्या सुचना द्याव्यात. नाशिक शहरातील नाका कामगारांसाठी रोजगाराच्या प्रतिक्षेत्र उभे राहण्याकरीता मजुरांसाठी छायाछत्र बनवुन देण्यासाठी म.न.पा. प्रशासनास प्रस्ताव पाठवावेत. अशी मागणी  बहुजन असंघटीत मजदूर युनियनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष विशाल भगवानराव भदर्गे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी  जिल्हासचिव भागवत गायकवाड, नाशिक शहराध्यक्ष गौतम कापुरे, सामाजिक कार्यकर्ते छगन खरात आदी पदाधिकारी ऊपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com