पंपिग बंद असल्याने सांडपाणी रस्त्यावर, खारटन रोडवरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
ठाणे
ठाणे शहरातील संपुर्ण सांडपाणी मलवाहिनीद्वारे सिवरेज ट्रीटमेंट केंद्र हे खारटन रोड परिसरात वेल क्र :०५ येथे येते. तिथुन पंपिंग होऊन तो पुढे पाठविले जाते, सदर ठिकाणी असलेले पंपिंग स्टेशन येथील वेल पुर्ण भरलेली आहे , मोटरी बंद आहेत ३ पैकी २ पंपिंग मशीन खराब आहे, यामुळे मागील काही दिवसांपासुन पंपिग बंद असल्याने प्रभागात सगळीकडे मलनिस्सारण विभागाच्या दुर्लक्षित प्रवृतिमुळे दुषित सांडपाणी रस्त्यावर जागोजागी वाहत आहे . या भरलेल्या वेलच्या दुर्गधीने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाला कळवून सुधा काही कारवाई होत नाही , रोगराई पसरण्याची शकयता नाकारता येत नाही. नागरिकांकडून टॅक्स वसुली करणारी ठाणे महानगर पालिका नागरिकांच्या सुविधांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तसेच स्थानिक नगरसेवकही याकडे कानाडोळा करीत असून महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे. पम्पिंग यंत्रणा तात्काळ दुरूस्त करावी. अशी मागणी प्रभाग क्र.२२ चे ठाणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रविण खैरालिया यांनी केली आहे.
0 टिप्पण्या