गायाने केला उत्पादन श्रेणीचा विस्तार तर मित्रोंची ५ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी
मुंबई
देशातील अग्रगण्य हेल्थ आणि वेलनेस ब्रँड गायाने ए२ हे गायीचे दूध लाँच केले आहे, जे सामान्य तुपाच्या तुलनेत अधिक आरोग्यदायी आणि उत्कृष्ट आहे. हे उत्पादन देशातील २५ राज्यांतील १२०० पेक्षा जास्त प्रीमियम आउटलेटवर उपलब्ध आहे. लवकरच ते अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह इतर अग्रगण्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. ए२ गायीच्या तुपाच्या लाँचिंगमुळे ब्रँडची उत्कृष्ट आरोग्याप्रतीची वचनबद्धता आणखी दृढ झाली आहे. या श्रेणीद्वारे गायाच्या सध्याच्या आरोग्यदायी खाद्य उत्पादने आणि न्युट्रिशनल सप्लीमेंटला नवा आयाम मिळेल.
गायाची पालक कंपनी कॉस्मिक न्यूटराकोस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापिका आणि संचालिका डॉली कुमार यांनी सांगितले की “ ग्राहक आमच्या उत्तम गुणवत्तेच्या उत्पादनांवर जो विश्वास ठेवतात, त्याच्याशी आम्ही तडजोड करू शकत नाहीत. आम्ही त्यांना असे उत्पादन देत आहोत, ज्याची गुणवत्ता सामान्य तुपात मिळू शकत नाही. उत्तम जेवण हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, यावर विश्वास ठेवणा-या ग्राहकांसाठीच गाया ए२ गायीचे दूध तयार करण्यात आले आहे.”
मित्रोंची ५ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी
मित्रों या स्वदेशी शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपने नेक्सस व्हेंचर पार्टनर्सच्या नेतृत्वात ५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी केली आहे. या ताज्या फेरीत मेकमाय ट्रिपचे अध्यक्ष दीप कालरा, पाइन लॅब्जचे सीईओ अमरीश राऊ, ज्युपिटरचे संस्थापक जितेन गुप्ता, (एमडी, स्पॉटिफाय इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमरजित बत्रा, फेसबुक आणि स्नॅपडीलचे माजी एक्झिक्युटिव्ह आनंद चंद्रशेखरन, गूगल क्लाऊड, इंडियाचे एमडी करण बाजवा, शॉपक्लेक्सचे सह संस्थापक राधिका घई आणि लेट्सव्हेंचरचे संस्थापक शांती मोहन यांनी सहभाग नोंदवला.
मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले, “ या प्रवासात नेक्सस व्हेंचर पार्टनर सहभागी झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या पोर्टफोलिओ कंपन्यांना उत्तम उत्पादने निर्मितीत मदत करण्याचे सूक्ष्म कौशल्य आहे. डिजिटल एंटरटेनमेंट आणि एंगेजमेंटची नवी कल्पना करत, भारतीय यूझर्ससाठी मित्रोंला जागतिक दर्जाचे उत्पादन बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्ले स्टोअरवर दर महिन्याला ३३ दशलक्ष डाउनलोड्स आणि ९ अब्ज व्हिडिओ व्ह्यूज मिळवणारे मित्रों हे भारतीय शॉर्ट फॉर्म व्हिडिओसाठी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. मित्रोंवरील प्रेमासाठी आम्ही यूझर्सचे आभारी आहोत.”
0 टिप्पण्या