Top Post Ad

उपनगरीय लोकलना वासिंद रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, मुख्यमंत्र्यांना साकडे




कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनकडून; 

वासिंद रेल्वे स्थानकला थांबा मिळावा,मुख्यमंत्र्यांना साकडे

 

शहापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली रेल्वे सेवा मुंबईत अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सुरू करण्यात आली परंतु वासिंद रेल्वे स्थानकाला या सेवेतून वगळण्यात आले,या स्थानकात लोकल न थांबता ती आसनगाव या स्टेशनला थांबते परिणामी वासिंद स्थानक मधून मुंबईत अत्यावश्यक सेवा करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ वासिंद थांबा सुरू करावा या मागणीचे लेखी निवेदन कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनकडून मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुंबई विभाग रेल्वे प्रबंधक यांना देण्यात आले.

 

मुंबईकडे कामाला जाणारी शेकडो कर्मचारी वर्गाला आपल्या कामावर जाण्यासाठी आसनगाव स्टेशन गाठावे लागते किंवा महामार्गावर येऊन मिळेल त्या वाहनांनी आपल्या सेवेवर रुजू होण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मुंबई किंवा उपनगरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां पैकी शेकडो महिला आहेत त्यांनी रेल्वेच्या या निर्णयामुळे नाराज झाल्या असून त्यांची खूप गैरसोय होत आहे असे कल्याण -कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन कडे या बाबत तक्रार केली असता या बाबत शासनाने याची दखल घेणे व रेल्वेच्या अधिकारी वर्गाने या बाबत त्वरित कार्यवाही करावी या साठी मंगळवारी कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन चे कार्याध्यक्ष डॉ.मनोहर सासे व वासिंद रेल्वे स्थानक प्रतिनिधी मुकेश दामोदरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव  ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच मुंबई विभाग रेल्वे प्रबंधक आणि वासिंद रेल्वे उप स्टेशन प्रबंधक भदोरीया यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी सदस्य बाळाराम शेलार, दिलीप गव्हाळे आदी उपस्थित होते.

 



 

 



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com