Trending

6/recent/ticker-posts

अखेर फेरिवाल्यांकरिता असलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेत मच्छी विक्रेत्यांचाही समावेश
अखेर फेरिवाल्यांकरिता असलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेत मच्छी विक्रेत्यांचाही समावेश


 मुंबईकरोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहार थांबून रोजगारावर गंडांतर आलेल्या फेरिवाल्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल मिळावे, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेत आता मच्छी विक्रेत्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. फेरिवाल्यांना १० हजार रुपये कर्जरुपाने देणाऱ्या या योजनेत मच्छी विक्रेत्यांचा, विशेषत: महिला मच्छी विक्रेत्यांचा समावेश करण्याची आग्रही मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केंद्र सरकारकडे केली. ही मागणी तातडीने मान्य करण्यात आली. पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या देशभरातील अमलबजावणीचा आढावा आज १८ ऑगस्ट रोजी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.


केवळ मच्छी विक्रेतेच नव्हे, तर रस्त्यावर विक्री करणाऱ्या अन्य श्रेणींतील फेरिवाले व महिला बचत गटांनाही गरजेनुसार या योजनेत समाविष्ट करण्याची मुभा देण्यात आली आहे.   महाराष्ट्राने पाच ते सात लाख फेरिवाल्यांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून प्रत्येक शहरातील अधिकाधिक फेरिवाल्यांना या योजनेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. लोकांना फेरिवाल्यांचा त्रास होणार नाही, अशा प्रकारे ही योजना राबवली जाईल,  केंद्र सरकारने या योजनेसाठी पात्र असलेल्या फेरिवाल्यांच्या विविध श्रेणी नमूद केल्या आहेत. परंतु, महाराष्ट्रात मच्छी विक्रेते, विशेषत: महिला मच्छी विक्रेत्या मोठ्या प्रमाणावर असून त्यांचाही या योजनेत समाविष्ट करण्याची परवानगी केंद्राने द्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली यावर शासनाला प्रशासनाने आखून दिलेल्या जागेत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अन्य कुठल्या श्रेणीतील फेरिवाल्यांचा अथवा महिला बचत गटांचा समावेश या योजनेत करायचा असल्यास त्यासाठीही केंद्राची कुठलीही आडकाठी नाही, असेही पुरी यांनी यावेळी स्पष्ट केले.


 
 
  
Post a Comment

0 Comments